जालन्यात नदीच्या पुरात मामा-भाचे गेले वाहून, एकास वाचविण्यास यश

file photo
file photo
Summary

प्रतीक्षेला लावणाऱ्या पावसाने अखेर जालना जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी हजेरी लावली. मृगधारा बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात विशेषतः अंबड तालुक्यातील विविध भागात पावसाने चांगली हजेरी लावली.

पारध (जि.जालना) : भोकरदन Bhokardan तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील नदीला आलेल्या पुरात बुधवारी (ता.१६) सायंकाळी मामा-भाचे असे दोनजण वाहून गेले. दरम्यान, एकास वाचविण्यात यश आले तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. पारध व परिसरात बुधवारी जोरदार पाऊस Rain पडला. दरम्यान, धाड येथील गॅरेजवर काम करणारे सलीम सय्यद (वय ४० व सय्यद शाहेद सय्यद सईद (वय २०) असे दोघे मामा-भाचे रोजप्रमाणे कामावरून परतत होते. त्यातच अवघडराव सावंगी गावाजवळील नदीला सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने पूर आला. यात सय्यद शाहेद सय्यद सईद हा वाहून गेला. तर सलीम सय्यद (वय ४० ) याला वाचविण्यात यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी या तरुणाचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान, घटनेची रात्री उशिरापर्यंत पारध पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आलेली नव्हती.Two Men Flow Into River Flood In Jalna District

file photo
पोलिस हेडकॉन्स्टेबलचा धक्कादायक शेवट, गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी

प्रतीक्षेला लावणाऱ्या पावसाने अखेर जालना Jalna जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी हजेरी लावली. मृगधारा बरसल्याने शेतकऱ्यांच्या Farmer आशाही पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात विशेषतः अंबड तालुक्यातील विविध भागात पावसाने चांगली हजेरी लावली. वडीगोद्री, अंतरवाली सराटी, रोहिलागड परिसरात चांगला पाऊस बरसला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, पारध, केदारखेडा परिसरात चांगला पाऊस झाला. गिरिजा-पूर्णा नदीही दुथडी वाहिली. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात सरासरी १.७० मिलिमीटर एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्यात आतापर्यंत ६८.६०, बदनापूर तालुक्यात ०.१० मिलिमीटर तर आतापर्यंत ९१.३०, भोकरदनला ५.१० तर आतापर्यंत ५२.९०, जाफराबादला ७ तर आतापर्यंत ४३.७०, परतूरला आतापर्यंत १६०.९०, मंठा तालुक्यात ०.१० तर आतापर्यंत १२२.६०, अंबड तालुक्यात आतापर्यंत ११९.२०, घनसावंगी तालुक्यात ०.७० तर आतापर्यंत १२६.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वडीगोद्री भागात मुसळधार पाऊस

अंबड Ambad तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. वडीगोद्री ते अंतरवाली सराटी येथील रस्त्यावरील सुखी नाल्याला पाणी आले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक थांबली होती. दरम्‍यान, या पावसाने पेरणीच्‍या कामाला वेग येणार आहे. जून महिन्‍याच्‍या सुरुवातीस झालेल्‍या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र त्‍यानंतर पावसाने उघडीप दिल्‍याने कोवळी पिके सुकू लागली होती. पाणी उपलब्‍ध असलेल्‍या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते. त्‍यातच बुधवारी दुपारी झालेल्‍या जोरदार पावसाने पिकांना जीवदान मिळाला आहे. शेतातील फळबागांना, ऊस आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. पाणी पातळीत या पावसामुळे वाढ होण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com