esakal | परभणीला दोन रुग्णांचा मृत्यू, ७७ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिंतूर शहरात कोरोना बाधित गरोदर मातेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता.३०) दुपारच्या वेळी शहरात घडली.

परभणीला दोन रुग्णांचा मृत्यू, ७७ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३९३ वर पोहचली आहे. जिल्हाभरात आतापर्यंत २२६ रुग्णांचा मृत्यू झाला.

परभणीत एक, तर पूर्णा तालुक्यात पाच बाधित 
शहर महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता. ३०) शहरातील पाच केंद्र, सात खासगी रुग्णालयांत ६८ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ६७ निगेटिव्ह तर एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. तर पूर्णा तालुक्यात ४३ संशयितांची रॅपिड अँटीजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यात पाचजण कोरोनाबाधित आढळले. ग्रामीण रुग्णालयांतर्गत १६ संशयितांची बुधवारी (ता.३०) रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन कोरोनाबाधित आढळले. येथील अंबिकानगरमधील ४० वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील २० वर्षीय पुरुष, खुजडा येथील ३६ वर्षीय पुरुष बाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात २७ संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात नांदेड येथील ३७ व ७१ वर्षीय महिला बाधित आढळून आल्या.

हेही वाचा - परभणी : कडसावंगीकरांची आश्‍वासनांवर केली जाते बोळवण; मूलभूत समस्या जशास तशा

कोरोना बाधित गर्भवतीचे रुग्णालयातून पलायन 
जिंतूर ः कोरोना बाधित गरोदर मातेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता.३०) दुपारच्या वेळी शहरात घडली. प्रत्येक बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांसाठी तपासणी शिबिर आयोजित केले जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या शिबिरात कोरोना रोगाचीही तपासणी करण्याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी सूचना केल्यानुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ राठोड यांनी अकरा गरोदर मातांची कोरोना तपासणी केली असता त्यात शहरातील राम मंदिर परिसरातील एक सात महिन्याची गर्भवती स्त्री कोरोना पाझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तपासणीनंतर तीस इतर स्त्रियांपासून वेगळे बसवले असता तिने तेथून पलायन केले. सदरील महिला पतीसोबत तपासणीसाठी रुग्णालयात आली होती. या वेळी तिच्या पतीची देखील तपासणी करण्यात आली, त्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. बुधवारी (ता.३०) ग्रामीण रुग्णालयात एकूण २३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एक गरोदर महिला पाझिटिव्ह आढळून आली. 

हेही वाचा - *परभणी : एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु त्यातच पावसाची हजेरी *

बुधवारी (ता.३०) रात्री साडेसात वाजेपर्यंतची आकडेवारी 

परभणी जिल्हा
एकूण बाधित - पाच हजार ३९३
आजचे बाधित - ७७
आजचे मृत्यु - दोन 
एकूण बरे - चार हजार ५४०
उपचार सुरु असलेले - ६२७
एकूण मृत्यु - २२६

संपादन ः राजन मंगरुळकर