दुचाकी चोर गजाआड, चार दुचाकी जप्त  

प्रल्हाद कांबळे
रविवार, 19 एप्रिल 2020

सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळ यांच्या सापळ्यात दुचाकी चोर अडकला. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. 

नांदेड : आपल्या हद्दीतील दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळ यांच्या सापळ्यात दुचाकी चोर अडकला. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या असून त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहर व जिल्ह्यातील फरार व आणि पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळण्‍यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावरून पोलिस उपविभागीय अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या सुचनेवरुन पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांना आदेश दिले. 

हेही वाचा - सोशल डिस्टंन्सिंग, महाराष्ट्राच्या मानचिन्हाचे !

एपीआय रवी वाहूळे यांच्या पथकाची कारवाई

सध्या लॉकडाऊनचा बंदोबस्तात व्यस्त असतांनाही रवी वाहूळे आपल्या वरिष्ठांचे आदेश पाळत कर्मचारी संजय मुंडे, रामकिशन मोरे, लियाकत शेख, दिलीप राठोड, शिलराज ढवळे, राजकुमार डोंगरे, काकासाहेब जगताप आणि विशाल अटकोरे यांना सोबत घेऊन शनिवारी (ता. १८) रात्री आपल्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गोपनिय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयास्पद दुचाकीवरुन फिरणाऱ्या सोनु उर्फ सागर संजय रुंजकर रा. प्रभातनगर, जंगमवाडी, नांदेड याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळच्या दुचाकीबद्दल महिती विचारली असता त्याच्याकडे कुठलेच कागदपत्र आढळून आले नाही. 

चोरट्याकडून चार दुचाकी जप्त 

त्यानंतर त्याची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणून अधिक विचारपुस केली. सर्वप्रथम तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अजून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. त्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी दुचाकी चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता. त्याच्याकडून अजून काही दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता श्री. वाहूळे यांनी वर्तविली आहे. 

येथे क्लिक करा -  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालययात लवकरच होणार कोरोना चाचणी

विजयनगरमधून पुन्हा दुचाकी चोरीला 

शहराच्या विजयनगरमध्ये राहणारे माधव उत्तम केंद्रे यांनी आपली दुचाकी (एमएच३५-एबी-०३४३) ही अंगणात लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ता. १३ ते १४ एप्रिलच्या दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमत असलेली वरील क्रमांकाची दुचाकी लंपास केली. माधव केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. शेख करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thief arest, four-wheeler seized nanded news