esakal | बीड : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक; दोघे ठार, तर एक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) रात्री नागोबा फाटा येथे घडली.

बीड : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक; दोघे ठार, तर एक जखमी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) रात्री नागोबा फाटा येथे घडली. राजेश मुरलीधर कदम (रा. सौंदाना, ता.पाटोदा) व शुभम भड (रा. मोरगाव, ता. बीड) असे घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघातात वाघिरा (ता.पाटोदा) येथील राणी भारत बावणे ही महिला जखमी झाली.
शनिवार रात्री पावणेआठ वाजता हा अपघात झाला.

अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागोबा फाटा येथे दुचाकी (एमएच १६ एएच ४५३४) व बुलेटची (एमएच २३  बीए ३६६८) समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वरांचा जागीच मृत्यू झाला. तर, राणी भारत बामणे ही महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. फौजदार विलास जाधव, सुरेश पारधी, संतोष राऊत, श्री. गव्हाणे, महादेव ढाकणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image