

Uddhav Thackeray dharashiv setback
esakal
Shiv Sena Shinde Group : धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते डॉ. चेतन बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.