उद्धव ठाकरेंनी घेतले गोपीनाथराव मुंडेंच्या समाधीचे दर्शन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

गोपीनाथगडावर दिवंगत मुंडे यांच्या समाधीवर फुलांनी काढलेल्या धनुष्यबानावरील कमळाची पाहणी करून दर्शन घेतले. 
 

परळी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  उशिरा गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. परतीच्या पावसाने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

मंगळवारी त्यांचा माजलगाव आणि गेवराई या दोन तालुक्यांत पाहणी दौरा निश्चित होता. त्यात बदल करून श्री. ठाकरे परलीजवळ असलेल्या पांगरी येथील गोपीनाथगड येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचा दौऱ्यात बदल झाला. ठाकरे येणार असल्याने समाधीवर धनुष्यबानावर कमळ अशी फुलांची आरास काढली होती.

राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

दरम्यान, रात्री गंगाखेडहुन ठाकरे येथे पोचले आणि त्यांनी मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. ठाकरे आणि मुंडे कुटुंबात असलेले स्नेह उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांनी देखील जपले आहेत.

चंद्रकांत पाटलांना झटका; 'या' कारणांसाठी शिवसेनेने केला विरोध

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती आणि उद्धव ठाकरे यांनी बदललेला नियोजित दौरा तसेच समाधीवर काढलेली आरास यामुळे या घटनेकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्या समवेत विधिमंडळातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, राजेश देशमुख आदी सोबत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackreay visits at Gopinath Gadh parali Beed