चंद्रकांत पाटलांना झटका; शिवसेनेचा 'या' कारणांसाठी विरोध

अभय जोशी
Tuesday, 5 November 2019

सध्याचे राज्य सरकार हे काळजीवाहू सरकार आहे. सांगली कोल्हापूर भागातील पूर परिस्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अपयशी ठरले होते. त्यामुळे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते न करता राज्यपाल अथवा वारकरी भक्ताकडून करावी. पाटील यांना शिवसेना श्री विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी दिला आहे. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

पंढरपूर : सध्याचे राज्य सरकार हे काळजीवाहू सरकार आहे. सांगली कोल्हापूर भागातील पूर परिस्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अपयशी ठरले होते. त्यामुळे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते न करता राज्यपाल अथवा वारकरी भक्ताकडून करावी. पाटील यांना शिवसेना श्री विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी दिला आहे. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

राज्यापालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

आठ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंदळे यांनी मंदिर समितीला दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, चंद्रकांत पाटील हे सध्याच्या काळजीवाहू सरकार मधील काळजीवाहू मंत्री आहेत. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री पाटील हे कोल्हापूर, सांगली भागातील पूर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. पूरग्रस्तांना ठोस अशी कोणतीही मदत झाली नाही. पंढरपूर मधील अनेक पूरग्रस्त अजून शासकीय मदतीपासून वंचित आहेत.

रणनिती तयार; आमदार फुटण्याचे धाडस करणार नाहीत : थोरात

पिक विम्याचे पंचनामे आणि शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अद्यापर्यंत किती जणांना मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. अशा परिस्थितीत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्यपाल अथवा वारकरी भक्ताकडून करावी. पाटील यांना शिवसेना श्री विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक श्री केंदळे यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Demnds Pandharpur Pandurang worship by Governor instead of Chandrakant Patil