दिलासादायक ! अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या अस्थमाग्रस्त आजीने केली कोरोनावर मात

युवराज धोतरे 
Wednesday, 12 August 2020

कोरोनाबाधित झाल्यावर माणूसाचे खच्चीकरण होते. त्यात वेगवेगळ्या आजाराने जर ग्रासले असेल तर मृत्यू झालाच अशी भिती निर्माण झाली आहे. मात्र उदगीर कोवीड केअर सेंटरमधील ८८ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेले अस्थमाचा आजार असताना देखील सकारात्मक विचार आणि योग्य औषधोपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. या घटनेने सर्वांना दिलासा मिळाला आहे. 

उदगीर (जि.लातुर) : घरामध्ये सुद्धा ऑक्सिजन घ्यावे लागते एवढा गंभीर अस्थमाचा (दमा) आजार असतानाही कोरोनाची लागण झालेल्या एका अठ्ठ्याऐंशी वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. यशस्वी उपचारानंतर येथील कोविड रुग्णालयातून बुधवारी (ता.१२) या महीलेस सुट्टी देण्यात आली.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

बुधवारी येथील रुग्णालयातून यशस्वी उपचारानंतर एकूण तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यावेळी औरंगाबादचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार फड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ दत्तात्रय पवार आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

एसटी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका माजी सैनिक पत्नी असलेल्या ८८ वर्षीय महिलेने इच्छाशक्ती व डॉक्टरांनी दिलेल्या या उपचाराच्या आधारे कोरोना वर मात केली आहे. हाळी (ता.उदगीर) येथील एका पन्नास वर्षीय महिलेने तब्बल वीस दिवसानंतर कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे व्हेंटिलेटरवर उपचार घेऊन या महिलेने कोरोनाला हरवले असून या दोन महिलांमुळे उदगीरकरांना दिलासा मिळाला आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

मंगळवारी (ता.११) एकूण २२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. मंगळवार पर्यंत येथील कोरोना रुग्णालयात उदगीर ५८५, जळकोट ८, निलंगा २, अहमदपूर ७, मुंबई ३, चाकूर १२, हैदराबाद १, मुखेड ७, देवणी १७, बिदर ५, पुणे १ शिरूर अनंतपाळ २ अशा  कोरोणाची बाधा झालेल्या एकुण ६५० रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ३८ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी २७९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.१०५ रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविड रुग्णालयात ६०, लाॅयन्स नेत्र रूग्णालयात १८, जयहिंद वसतिगृह २५ तर तोंडारपाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ६६ अशा एकुण १८६ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. देशपांडे यांनी दिली आहे.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer city 88 year old lady corona free