esakal | उदगीर जिल्हा करायचा असेल तर महाराज म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

उदगीर जिल्हा निर्मितीची लढाई ही कोण्या एका जाती-धर्माची नाही. यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वांना सामावून घेत हा जिल्हा निर्मितीचा लढा उभारला पाहिजे.

उदगीर जिल्हा करायचा असेल तर महाराज म्हणतात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उदगीर (लातूर) : उदगीर जिल्हा हवा असेल तर केवळ एका धर्माचे, समुदायाचे नागरीक नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या सामूहिक लढ्याची आवश्यकता आहे. सर्वांना सोबत घेऊन लढा उभारल्यास निश्‍चितपणे राज दरबारी याची दखल घेतली जाईल असे मत राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य यांनी व्यक्त केले.

येथील रघुकुल मंगल कार्यालयात रविवारी (ता. 23) आयोजित संकल्प सिद्धी पायीदिंडीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.लिगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील, चाकूर (जि. लातूर) पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेगेटोल, अशोक मुळे, रतिकांत स्वामी, कुणाल बागबंदे, बालिका मुळे, बसवराज कानमंदे, शीलाताई मालोदे, श्रीकांत पाटील, संजय उस्तुरगे, नंदकुमार पटणे, या अभियानाचे प्रमुख प्रा दत्ता खंकरे, निमंत्रक राजकुमार बिरादार आदी उपस्थित होते.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

यावेळी डॉ शिवाचार्य म्हणाले, उदगीर जिल्हा निर्मितीची लढाई ही कोण्या एका जाती-धर्माची नाही. यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वांना सामावून घेत हा जिल्हा निर्मितीचा लढा उभारला पाहिजे. शहरांमध्ये सर्व सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी जिल्हा निर्मिती आवश्यक आहे.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

यावेळी श्री केंद्रे म्हणाले डॉ शिवाचार्य यांच्या भक्ताचे महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक सीमाभागात मोठे जाळे आहे.आमच्या या भागातील अस्मिता आहे.यांना भारतरत्न मिळण्यासाठी जिल्हा परिषद लवकरच ठराव घेणार आहे. शिवाय जिल्हा निर्मिती व मुक्रमाबाद तालुका निर्मितीसाठी मी या अभियाना सोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पायी दिंडीचे जोरदार स्वागत

डॉ. शिवाचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी मुक्रमाबादहुन -अहमदपूर कडे जाणाऱ्या पायी दिंडीचे येथील वसंतराव नाईक चौकात जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी अभियान प्रमुख प्रा. खंकरे, निमंत्रक श्री बिरादार, नागेश अंबेगावे, प्रा शेटकार, मनोहर येरनाळे, पप्पु डांगे, साईनाथ चिमेगाव, ओमकार गांजुरे, अनिकेत पांढरे, चंद्रकांत भोसगे, प्रशांत देवशेटे, गजेंद्र राठोड, महेश पालीवाल, गणेश गायकवाड, शिवशंकर पांडे, शिवाजी लकवाले, सुमित बेनकुंदे, अंकुश बिरादार, डॉ. रवी मुळे आदी उपस्थित होते.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणार