उदगीरात मंगळवारी तब्बल 572 नामनिर्देशनपत्र; महिला उमेदवारांची आघाडी

युवराज धोतरे
Wednesday, 30 December 2020

तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मंगळवारी (ता.२९) तब्बल 572 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मंगळवारी (ता.२९) तब्बल 572 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात महिला उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी मंगळवारी उदगीरच्या तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप आले होते. गावागावातून उमेदवार आपल्या समर्थकांसह नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आले होते. मंगळवारी तब्बल तीनशे अकरा महिला उमेदवारांनी तर 261 पुरुष अश्या एकूण 572 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात महिला उमेदवार पुरुषांना मागे सारत आघाडीवर असल्याचे दिसून आले.

नगरपंचायत निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार, जालना जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय

तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 61 ग्रामपंचायतीसाठी मंगळवार पर्यंत एकूण 785 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात एकूण 424 महिला तर 361 पुरुष उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
यात सर्वाधिक नामनिर्देशनपत्र दाखल केलेली ग्रामपंचायतीची नावे व कंसात दाखल नामनिर्देशनपत्राची संख्या खालील प्रमाणे आहे. निडेबन (49), हेर (48), हंडरगुळी (35), वाढवणा बु (41), वाढवणा खू (47), लोणी (30) चांदेगाव (25), लोहारा (25).

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

त्या चाळीस कर्मचाऱ्यांना आयोगाची नोटीस-
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या त्याचा चाळीस कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. आपणास निवडणुकी साठी आयोजित प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदेश देऊनही आपण कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्यावर शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये? याचा खुलासा तात्काळ सादर करण्याचे आदेश तहसीलदार रामेश्वर यांनी दिले आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir Latur political news nomination form gram panchayat election