Udgir News : युवा महोत्सवात कोरोना नियमावलीचा भंग

आयोजक व क्रीडा विभाग कोरोना बाबत उदासीन
udgir news health coronavirus guidelines violation at yuva mahotsav latur
udgir news health coronavirus guidelines violation at yuva mahotsav laturSakal

उदगीर (जि.लातुर) : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून उदगीर येथे ता. २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात वाढत्या कोरोना संसर्गजन्य परीस्थितीच्या पार्श्वभूमी कुठल्याच उपयोजना करण्यात आल्या नाहीत.

त्यामुळे राज्यभरातून आलेल्या आठशे स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षकांना कोरोना संसर्गाच्या धोक्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. देशभरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात जे एन वन या नव्या व्हेरीयंटने राज्यातच नव्हे तर देशभरात धुमाकूळ घातला आहे.

या पार्श्वभूमीवर उदगीर येथे क्रीडा व युवक संचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी काळजी घ्यायला हवी होती मास्क, सँनिटायजर व कोरोना संसर्गासंबंधीच्या आवश्यक त्या सूचना दिल्या पाहिजे होत्या.

मात्र या प्रकारची कुठलीही काळजी आयोजकांनी घेतली नसल्यामुळे या परिसरात जमा झालेल्या जवळपास दीड हजार स्पर्धक व प्रेक्षकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास आठ क्रीडा विभागातून येथे स्पर्धक दाखल झाले आहेत. त्यात जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती विभागातील स्पर्धक व परीक्षकांचा समावेश असून या परिसरात कर्नाटक सीमा भागातील प्रेक्षक नागरिक ही सहभागी होत आहेत.

त्यामुळे कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात कोरोना संसर्गाची धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर यातून संसर्ग झाला तर राज्यभरात संसर्गाचा वेग वाढण्यास मदत होणार असल्याने शासनाच्या क्रीडा व युवक संचनालय या विभागाने काळजी घेणे आवश्यक होते.

सर्वांना मास्क उपलब्ध करुन देवु

याबाबत क्रीडा व युवक संचनालयाचे उपसंचालक युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जर असे असेल तर सर्वांना आम्ही मास्क उपलब्ध करून देऊ. लगेच मी आमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून मास्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com