उदगीरात वाहतूककोंडीचा फटका 'मालगाडी' ला, अर्धा तास गेटवरच 'स्टॉप' 

युवराज धोतरे 
Thursday, 8 October 2020

शहरातील डॅम रोडवर असलेल्या समता नगर रेल्वे गेटवर सातत्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

उदगीर (लातूर) : शहरातील समता नगर रेल्वेगेटवर वाहतूकीची कोंडी झाल्याने रेल्वे स्थानकातून निघालेली मालगाडी गेट जवळ अर्धा तास थांबवावी लागली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मालगाडी सोडण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता.८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील डॅम रोडवर असलेल्या समता नगर रेल्वे गेटवर सातत्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. या परिसरात लातूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आडत बाजार असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील शेतकरी, व्यापाऱ्यांचा शेतीमाल येथे येतो. अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल या रस्त्यावरून येतो.

समता नगर भागात उदगीर शहरालगतच्या अनेक वाढीव वस्त्या वाढल्याने या भागातील नागरिकांना सतत या समता नगर रेल्वे गेट वरून जावे-यावे लागते. या भागात सतत रेल्वेगेट पडत असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या भागातील नागरिकांनी मागणी करूनही येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उदगीर विधानसभा असो की नगरपालिका गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सातत्याने प्रत्येक राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हा भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करून देण्याचे खोटी आश्वासने अनेक राजकीय पक्षांकडून देण्यात येत आहेत. मात्र अजूनही या रेल्वे गेटवर कोणतीच सुविधा करून देण्यात न आल्याने वाहतुकीच्या कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. गुरुवारी तर या वाहतूक कोंडीचा कहर झाला. परळीहून सिकंदराबाद कडे निघालेली माळवाडी रेल्वे गेट जवळ अर्धा तास थांबवावी लागली. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर काही सजग नागरिक पुढे येऊन तिकोंडी सुरळीत करून रेल्वे गाडी काढून दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir railway news