उदगीर : १२९ गावांसाठी ४८० कोटींचे वॉटरग्रीड

आमदार बनसोडे यांनी करून दाखवले
Water grid
Water gridsakal

उदगीर : उदगीर विधानसभा मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यातील १२९ गावासाठी शासनाने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ४८० कोटी ९६२८ रुपयाच्या वाटरग्रीड योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली.

अनेक वर्षांपासून उदगीर व जळकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत होती. अनेक वेळा प्रासंगिक उपाय योजना राबवूनही टंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर करण्यात येत होता. उदगीर व जळकोट तालुक्यात तालुक्याची तहान भागवण्यासारखे मोठे प्रकल्प किंवा नद्यांचे स्त्रोत नसल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होत होते.

उदगीर मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून माजी राज्यमंत्री बनसोडे यांनी अनेक वेळा बैठका घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत मोठी वॉटर ग्रीड योजना राबवून ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र यासाठी ४८० कोटी रुपयांच्या निधीसाठी अडचण येत होती. अनेक वेळा प्रयत्न करून मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून अखेर आमदार बनसोडे यांनी ही योजना मंजुर करून घेण्यात यश मिळवले असून १२९ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

याबाबतचा सविस्तर बृहत आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांच्याकडे २२ जून रोजी पाठवला होता.१५ जीवन रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि तांत्रिक छाननी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या दोन तालुक्यातील १२९ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना दरडोई दर दिवशी अशी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याची ही योजना आहे। या अंदाजपत्रकास व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय १४ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी डॉ रवींद्र भराटे यांनी काढला आहे.

कंधारवरून येणार पाणी

उदगीर मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यातील 129 गावांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या वॉटर ग्रीड योजनेसाठीचे पाणी वारूळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथील मध्यम प्रकल्पातून आणण्यात येणार असून हंगरगा जळकोट मार्गे उदगीर तालुक्यात हे पाणी येणार आहे.

आमदार बनसोडे यांनी करून दाखवले

लातूर जिल्ह्याला (कै) विलासराव देशमुख यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळाले असतानासुद्धा उदगीर व जळकोटकराना मिळू शकले नाही. आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्याला तोंड देणाऱ्या नागरिकांसाठी टंचाईच्या परिस्थितीत लातूरकरांनी देऊ शकले नाहीत ते माजी राज्यमंत्री बनसोडे यांनी मतदार संघातील नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची योजना मंजूर केली आहे. त्यामुळे बनसोडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com