उमरग्यात कोरोना उपचार, तपासणीची दिरंगाई; ५८ जणांचा गेला आजवर बळी 

अविनाश काळे
Saturday, 31 October 2020

कोरोनाबाधित व्यक्तीचा अठरा तासाच्या आत मृत्यू
उमरगा उपचार, तपासणीच्या दिरंगाईमुळे वाढतोय धोका 

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग कमी झाल्याचे जसे संकेत मिळताहेत तसे नागरिकांमधील सतर्कता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उमरगा शहरातील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोविड रुग्णालयात शनिवारी (ता.३१) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीचा तपासणीसाठी आल्यानंतर अठरा तासाच्या आत मृत्यू ओढावला. दरम्यान सात महिन्याचा कालावधीत शहर व तालुक्यातील ५८ बाधित व्यक्तींच्या मृत्यू संख्येने चिंता व्यक्त केली जातेय. मात्र अजूनही लोकांमध्ये कोरोना संसर्गापासून दूर रहाण्याविषयीची सतर्कता बाळगली जात नाही.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहर व तालूक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसातील स्थिती पाहिली तर संसर्ग कमी झाल्याचे चित्र आहे मात्र कांही व्यक्ती बेजबाबदारपणाने वागत असल्याने कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढत आहे. 

 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमरगा तालुक्यात कोरोना संसर्ग एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. टप्प्या टप्प्याने रुग्णसंख्या कमी - अधिक होत गेली. गेल्या सात महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासुन संसर्गाचा धोका वाढत गेला आणि तब्बल साडेतीन महिन्यापर्यंत संसर्ग सुरू होता. मागच्या पंधरा - वीस दिवसात संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असताना गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. शुक्रवारी अन्टीजेनच्या तपासणीत सात तर घशातील द्रव पदार्थाच्या तपासणीत तीघे पॉझिटिव्ह आले. शनिवारच्या अन्टीजेनच्या तपासणीत तीन पॉझिटिव्ह आले. दरम्यान आत्तापर्यत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन हजार ७८ झाली आहे त्यात  शहरात ९२९ तर ग्रामीण भागात एक हजार १४९ रुग्णांची नोंद आहे. तर आत्तापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ९२० जणांनी मोठ्या धैर्याने उपचाराला सामोरे जात कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचारार्थ ९७ रुग्ण आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बेफिकीरी येतेय अंगलट !

शहरातील बालाजी नगर येथील ४८ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी सांयकाळी उपचारासाठी दाखल झाला, अन्टीजेनमध्ये तो पॉझिटिव्ह आला. अतिदक्षता कक्षात त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरम्यान कोरोना संसर्गामुळे रुग्णासह कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना कमी झाला म्हणून नागरिकांनी गाफिल रहाता कामा नये. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अजूनही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, अशी बेफिकीरी संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Corona Update news sevan month 58 corona death