esakal | Corona Update : उमरग्यात आज ४३ पॉझिटिव्ह; ५३१ जणांना मिळाला डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. शनिवारी (ता.२३) उमरग्यात अन्टीजेन टेस्टमध्ये एक पॉझिटिव्ह आले. 

Corona Update : उमरग्यात आज ४३ पॉझिटिव्ह; ५३१ जणांना मिळाला डिस्चार्ज

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. शनिवारी (ता.२३) उमरग्यात अन्टीजेन टेस्टमध्ये एक पॉझिटिव्ह आले. रात्री आलेल्या ८८ स्वॅबच्या अहवालात ४३ जण पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने गेल्या ५६ दिवसात बाधितांची संख्या ८८७ वर गेली आहे. शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. उमरगा शहरात ४९८ तर ग्रामीण मध्ये ३८९ रूग्ण संख्या झाली आहे.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

आत्तापर्यंत २९ पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यु झाला आहे. ५३१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून ३१७ जणावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पाठविलेल्या ८८ स्वॅबचा धक्कादायक अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाला. त्यात ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यात शहरात सोळा  रुग्ण असून दत्त कॉलनी एक, बालाजी नगर पाच शिवपुरी रोड दोन, अजय नगर दोन, आरोग्य नगर एक, माशाळाकर गल्ली चार, बँक कॉलनी एक. ग्रामीणमध्ये २७ रूग्ण असून त्यात काटेवाडीत दोन, तलमोड सात, कदेर एक, मुळज एक, भुयार चिचोली एक, भिकार सांगवी एक, येणेगुर चार, महालिंगरायवाडी दोन, मुरुम सहा तर कर्नाटकातील अतलापूर (ता.आळंद) एक व बसवकल्याण येथील एक रुग्ण आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  
५३१ जणांना मिळाला डिस्चार्ज
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी लोकांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभिर्य दिसत नाही. मृत्यूची संख्याही विचार करायला लावणारी आहे. सध्या ३१७ जणांवर उमरगा, मुरुम, पर जिल्हयात उपचार सुरू आहेत शिवाय होम आयसूलेशनमध्ये रूग्ण औषधोपचार घेत आहेत. आतापर्यंत ५३१ जणांना डिस्चार्ज मिळाला, ही बाब चांगली असली असली वाढत्या रूग्णसंख्याही नागरिकांना विचार करायला लावणारी आहे. प्रशासनाकडून त्यांच्या पातळीवर जमेल तेवढे उपाययोजनांचे प्रयत्न केले जात आहेत त्यापेक्षा आता नागरिकांनीच संसर्ग रोखण्यासाठी सावधनात बाळगणे गरजेचे झाले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

 
 

loading image