Corona-Virus : उमरग्यात आज ७६ पॉझिटिव्ह, मुरुममधील एकाच कुटुंबात आठ जणांना कोरोना  

अविनाश काळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शहरातील कोविड रुग्णालयातून शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या १४२ स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाला. त्यात ६३ पॉझिटिव्ह आले. रविवारी त्यात तेराची भर पडल्याने शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील २९ असे ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

उमरगा :   कोरोना संसर्गाची साखळी कांही केल्या तुटेनाशी झाली आहे. कम्युनिटी स्प्रेड वाढतच चालले असून शनिवारी (ता. एक) रात्री तब्बल ६३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान रविवारी (ता.दोन) दुपारी प्रलंबित अहवालातील पाच पॉझिटिव्ह आले आहेत. तर अॅन्टीजेंट टेस्टमध्ये मुरुम येथील एकाच कुटुंबातील आठ पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या ३६ दिवसात चक्क ४१३ रुग्णसंख्या झाली आहेत.

शहरातील कोविड रुग्णालयातून शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या १४२ स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाला. त्यात ६३ पॉझिटिव्ह आले. रविवारी त्यात तेराची भर पडल्याने शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील २९ असे ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता ४१३ झाली आहे. एकुण ३६ दिवसात शहरात २९६ तर ग्रामीणमध्ये ११७ झाली आहे. त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला असून सव्वाशेहुन अधिक रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर २६० जणांवर उपचार सुरू आहेत. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान शनिवारी रात्री आलेल्या रविवारी दुपारी आलेल्या अहवालात शहरातील बालाजी नगर दोन, मलंग प्लॉट सहा, काळे प्लॉट चार, जुनी पेठ पाच, जकापुर कॉलनी दोन, सदर नगर एक, इंदिरा चौक तीन, शिवाजी चौक तीन, बस स्टँड जवळ चार, महादेव गल्ली दोन,अजय नगर आठ, संगमेश्वर नर्सिंग होम एक, चालुक्य कॉलनी दोन, बेडदुर्गे  हॉस्पिटल एक, कुंभारपट्टी एक, नगर पालिका एक, एस. टी. कॉलनी एक असे शहरातील ४७ तर ग्रामीण मध्ये तुरोरी पाच, गुंजोटी पाच, दाबका दोन, एकोंडी (जहागीर) दोन, कोरेगाव दोन, दुधनाळ एक, सालेगाव (लोहारा) एक, जकेकुर येथे दोन असे २९ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

अॅन्टीजेंट तपासणीत आठ पॉझिटिव्ह

रविवारी उमरग्यात झालेल्या वीस अॅन्टीजेंट तपासणीचा सर्व अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र मुरुम येथे झालेल्या पंधरा जणांच्या तपासणीत आठ जण पॉझिटिव्ह आले आहेत ते शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील आहेत. दरम्यान उमरग्यातुन ४७ तर मुरुममधून एक असे ४८ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga corona Update today 76 new corona patient