Shiv Sena Banner Controversy : राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) सध्या जिल्हा दौऱ्यावर असून, आज उमरगा येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी त्यांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी बॅनर लावून जोरदार तयारी केली होती. मात्र, बॅनरवर काही स्थानिक नेत्यांचे फोटो न लावल्यामुळे शिवसैनिकांमध्येच वाद निर्माण झाला आणि हे बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडल्याची घटना घडली आहे.