
उमरगा शहर व ग्रामीण भागात समुह संपर्कामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. आत्तापर्यंत १११ बांधितांची संख्या आहे, त्यात ९४ बाधित २२ दिवसातील आहेत. दरम्यान पन्नास बेड क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत असल्याने शंभर बेड क्षमता असलेले संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयच कोविड रुग्णालय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उमरगा : उमरगा शहर व ग्रामीण भागात समुह संपर्कामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. आत्तापर्यंत १११ बांधितांची संख्या आहे, त्यात ९४ बाधित २२ दिवसातील आहेत. शनिवारी (ता.१९) सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा सोलापूर येथे मृत्यु झाल्याने आता मृत्यूची संख्या नऊ झाली आहे. दरम्यान पन्नास बेड क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत असल्याने शंभर बेड क्षमता असलेले संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयच कोविड रुग्णालय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा शहरात प्रारंभीच्या काळात कोरोना बाधितांची संख्या कमी होती. सतरा बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. उर्वरीत सोळा जण रोगमूक्त झाले होते. मात्र २७ जूनपासून समूह संपर्कामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ९४ बाधित संख्येपैकी आठ जणांचा मृत्यू झालेला आहे.
कोविड रुग्णालयाची व्याप्ती वाढवण्याची गरज
दररोज रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टर्स व कर्मचारी जोखीमेतुन काम करत आहेत. मात्र येथील उपजिल्हा रुग्णालयातील पन्नास बेड क्षमतेचे कोविड आयसोलेशन कक्ष अपुरे पडत आहेत. सध्या रुग्णालयात बाधितांची संख्या १९ आहे. शनिवारी ८६ तर रविवारी आठ स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. दररोज स्वॅबची संख्या वाढत असल्याने संशयित रुग्णांना सस्पेक्टेट सेक्शनमध्ये जागा अपुरी पडत आहे. तपासणीत निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना चौदा दिवस क्वारंटाइन केंद्रात रहाणे बंधनकारक असल्याने शहरातील एक व मुरूम येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना ठेवले जात आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
तेथील अपुऱ्या सुविधामुळे रुग्णांना किळस येत असल्याने कांही जण पुढाऱ्या मार्फत अधिकाऱ्यांना फोनाफोनी करुन घरात रहात आहे. मात्र त्यांच्यापासुन संसर्ग वाढू शकतो. दरम्यान कोविड रूग्णालयात अती गंभीर रुग्णावर उपचारासाठी तज्ञ डॉक्टर्स आणि व्हेंटिलेटरची पुरेशी सोय नसल्याने रेफर केल्यानंतर रुग्ण दगावत आहेत.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
गेल्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात विविध आजाराने खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेली संख्या ९० आहे. त्यात कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची आकडेवारी नगण्य असली तरी हदयरोग, मधूमेह, रक्तदाब आदी दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व पन्नाशी ओलांडलेले व्यक्तीचे मानसिक धैर्य खचल्याने मृत्यु होतो आहे. सध्याची कठीण परिस्थिती लक्षात घेता कोविड रुग्णालयाची व्याप्ती वाढविण्याची गरज असून तेथे अत्याधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकिय स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. सरकारी आरोग्य यंत्रणेत खासगी व्यवसायातील तज्ञ डॉक्टर्सना सामावुन घेऊन गरिब रूग्णांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
५८ जणांची कोरोनावर मात
शहर व तालुक्यातील १११ बाधितापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण रोगमूक्त झाले आहेत. सध्या ४४ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील १९ रुग्ण येथील कोवीड रूग्णालयात असून उर्वरीतांपैकी सर्वाधिक रूग्णावर सोलापूर येथे तर कांही उस्मानाबाद शासकिय रूग्णालय व लातुरला उपचार सुरू आहेत. दरम्यान येथील कोविड रुग्णालयात आरोग्य सुविधेची सक्षम यंत्रणा नसल्याने गरिब रुग्णांची वाताहत होत आहे. श्रीमंतांना खाजगी रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध होत आहे. मात्र गरिबांनी कोठे जायचे हा यक्ष प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.