
अस्वच्छता व दारुच्या बाटल्या आढळल्याने स्वच्छता कर्मचा-यांचे वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे दिले आदेश.
अहमदपूर (जि.लातूर) : अहमदपूर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन सर्वाधिक रूग्ण तपासणी होत असते. परिसरातील पंधरा किलोमीटर अंतरावरील गावातील तीन जिल्ह्यातील रूग्ण तपासणीसाठी या आरोग्य केंद्रात येतात. या केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अचानक भेट दिली. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती पाहून अध्यक्ष संतापले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पहाणी वेळी मोठ्या स्वरूपात अयोग्य बाबी समोर आल्या. रूग्णालयातील प्रत्येक खोलीचे कोपरे तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकीने रंगवल्याचे निदर्शनास आले. या आरोग्य केंद्रातील कर्मचारी स्वाक्षरी करून कर्तव्य न पार पाडता निघून जाणे. हालचाल नोंद वही फाटलेल्या अवस्थेत असून त्यांवर चुकीच्या नोंद आढळणे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
रूग्णाच्या रूममध्ये सिगारेट अर्धवट ओढून टाकलेल्या दिसून येणे. आरोग्य केंद्राच्या एका खोलीत पाणी शुद्धीकरण यंत्राच्या बाजूला मद्याची रिकामी बॉटल आढळणे असा गंभीर प्रकार पाहून संतापलेल्या अध्यक्षांनी या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची कानउघाडणी करून सर्व बाबींचा पंचनामा केला. अस्वच्छतेचा कहर पाहून तीन स्वच्छता कर्मचा-यांवर एक वर्षाची वेतनवाढ थांबवण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले. या भेटी वेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुट्टे यांची उपस्थिती होती.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(Edited By Pratap Awachar)