esakal | काडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा'
sakal

बोलून बातमी शोधा

amma.jpg

उमरगा तालुक्यातील येणेगुर गावात मागील पाच वर्षांपासून एक अवलिया अम्मा राहते आहे. परप्रांतातून आलेली या अवलिया अम्माला मराठी, हिंदी भाषेचा लवलेशही नाही. मात्र, हातात पडलेल्या काडीलाही ती ब्रश करुन आपल्या विश्‍वात रममाण झालेली असते. तीचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. वाचा तीचा प्रवास. 

काडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा'

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : वयाची सत्तरी ओलांडलेली एक जेष्ठ, परप्रांतिय महिला गेल्या पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात राहते आहे. "एक अवलिया परप्रांतिय अम्मा" म्हणुन तिचे ग्रामस्थांशी नाते जुळले आहे. चहा, पाणी व जेवणाच्या सोयीचे नियोजन अनेकाकडून केली जाते. एका गाठोड्यात बिस्तारा. पेटींगचा छंद असल्याने कोऱ्या कागदावर रंग-बेरंगी चित्र ती रेखाटते. त्याच विश्वात ती ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गुजरान करते आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात गेल्या पाच-सहा वर्षापासून एक अनोळखी जेष्ठ महिला आकाशाला छ्त समजून एका वेगळ्या विश्वात रहाते आहे. राजस्थान राज्यातील कोठा जिल्हयातील पापडा गावची रहिवाशी असून तिचे नाव मांगी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तिला मराठी, हिंदी भाषा कळत नसली तरी हातवारे आणि कांही त्रोटक संभाषणाप्रमाणे मोजकेच बोलते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कलेच्या विश्वात रमते...! 

एक मोठे गाठोडे त्यात दोन घास खाण्यासाठी ताट, तांब्या आणि पेटींगच्या कलेचा छंद असल्याने मोडके-तोडके पेंटिगचे साहित्य नेहमी तिच्यासोबत असते. दररोज सकाळी ती उठून रस्त्यालगत बसते. काडीलाही ब्रश करून ग्लासातील साध्या रंगाचे प्रतिबिंब कोऱ्या कागदावर उमटवत दिवसभराचा वेळ घालवते. गावातील अनेकजण तिला मदत करतात, जेवण, पाणी आणि पैसेही देतात.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु ती फक्त १० रुपयाचीच स्विकाराते अन् गाठोड्यात ठेवते. जिल्हा परिषदेचे सदस्य रफीक तांबोळी, येणेगुर महोत्सवाचे संचालक महाविर सुरवसे, शंकर वागदरे, शिवानंद हंगरगे, राजाराम जाधव, सुधाकर हुळमजगे, तुळशिदास बंडगर, सचिन गुंजोटे आदींची त्या अम्माला नेहमी असते. गणेश बंडगर, श्रीमती हमीदाबी शेख यांच्याकडून तिची काळजी घेतली जाते. दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, अशा कठीण दिवसातही ति संसर्गापासुन अलिप्त आहे.

" राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावात मानसिक स्वास्थ हरवलेल्या व्यक्तीना सोडून दिले जाते. अम्माला पेंटिंगचा छंद आहे. पेटींग झाली का, झोपा जाऊ का या सर्वच प्रश्नांना ती छान प्रतिसाद देते, तिच्या बोलण्यातून ती राजस्थानी  असल्याचे समजते. दाल-  बाटी हा शब्द तीच्या नेहमीच बोलण्यातून व्यक्त होतो. ती कोणत्याही राज्यातील असली तरी तिला येणेगुरचा लळा खुपच लागलेला आहे. तिच्या बोलण्यातून गावाकडे जाण्याची इच्छा दिसत नाही. येणाऱ्या काळात काही नियोजन झाल्यास प्रशासनाच्या मदतीने घरी सोडण्याचा मानस आहे.

- प्रदीप मदने, संयोजक येणेगुर फेस्टीवल 

संपादन-