उस्मानाबाद : विद्यापीठातील प्रयोगशाळा अंतिम टप्प्यात, आठ दिवसात कोरोना टेस्ट होणार

सयाजी शेळके
Wednesday, 15 July 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या, संस्थांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगशाळेची अनेक वैशिष्ट्य आहेत. आता पुढील आठवड्यात ही प्रयोगशाळा जिल्हावासीयांना सेवा देणार आहे.

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या, संस्थांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगशाळेची अनेक वैशिष्ट्य आहेत. आता पुढील आठवड्यात ही प्रयोगशाळा जिल्हावासीयांना सेवा देणार आहे.
 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांची तपासणी केली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये जिल्ह्यातील स्वब  तपासणी पुणे येथे केली जात होती. त्यानंतर स्वब तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले होते. मात्र तिथेही गर्दी वाढली. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वॅब तपासणी लातूर येथे करण्याचे काम सुरू झाले. मात्र लातूर येथेही मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील स्वॅबची तपासणी करण्यासाठी फरफट सुरू होती. काही स्वॅब लातूरला तर काही आंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जात होते. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

मात्र आता पुढील आठवड्यात उस्मानाबाद शहरात उभारण्यात आलेली प्रयोगशाळा कार्यान्वित होत आहे. ही प्रयोगशाळा आता जिल्हावासीयांनासाठी अविस्मरणीय वास्तू ठरणार आहे. शासनाच्या निधीतून एक रुपयाही न खर्च होता, केवळ दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नॅचरल शुगर, विठ्ठलसाई साखर कारखाना, बालाजी अमाईन्स, जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था आदींनी या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सहकार्य केले आहे. सुमारे ८० लाख रुपयांचा निधी या माध्यमातून उभारण्यात आला. तर विद्यापीठाने २० लाख रुपयांची मदत केली आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

पुढील आठवड्यात होणार चाचणी
प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपकेंद्रांमध्ये पोहोचले आहे. त्याची जोडणी करणारे अभियंतेही दाखल झाले आहेत. त्यांनी जोडण्याचे कामही सुरू केले असून दोन दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून काही स्वब नमुने तपासणीसाठी येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. दरम्यान हे स्वॅब नमुने यापूर्वी तपासणी केलेली आहेत. मात्र उपकेंद्रातील प्रयोगशाळेची चाचणी म्हणून त्याची तपासणी केली जाणार आहेत. त्याचे रिझल्ट योग्य आल्यानंतर शहरातील संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणी या प्रयोगशाळेत सुरू होणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात मंगळवार ते बुधवार या दरम्यान ही प्रयोगशाळा जिल्हावाशीयांच्या सेवेत सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुरेसे मनुष्यबळ 
विद्यापीठ उपकेंद्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी या प्रयोगशाळेत काम करणार आहे. त्यासाठी त्यांचे लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण पूर्ण झाले असून ते आता औरंगाबाद येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तिथून दोन दिवसात हे सर्व प्रशिक्षणार्थी येथील प्रयोगशाळेत कामासाठी रुजू होणार आहेत. त्यामुळे येत्या सात ते आठ दिवसात ही प्रयोगशाळा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यात केवळ दोन ते तीन आशा प्रयोगशाळा आहेत, की ज्या शासकीय रुग्णालय अशी किंवा वैद्यकीय महाविद्यालय अशी संलग्न नाहीत. अशी ही अनोखी प्रयोगशाळा आपल्या इथं सुरु होत आहे. पुढील आठवड्यात निश्चित येथून अहवालाची चाचणी होईल. शासनाचा निधी खर्च न करता नागरिकांच्या, विविध संस्थांच्या सहकार्यातून, प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. आयसीएमआर यांच्या निर्देशानुसार सर्व साहित्य या ठिकाणी बसविण्यात आले आहे. एक उच्च दर्जाची प्रयोगशाळा जिल्हावासीयांना पुढील आठवड्यात सेवेत रुजू होईल.

दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद. 

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: university laboratory in final stage corona test will take in eight days