esakal | शेतीचे नुकसान : उरल्या सुरल्या आशेवरही पाणी, मराठवाड्यात वादळी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Untimely rain in Marathwada

फळबागांना फटका, लातूरमध्ये वीज पडल्याने दहा जनावरे दगावली 

शेतीचे नुकसान : उरल्या सुरल्या आशेवरही पाणी, मराठवाड्यात वादळी पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे अनेकांचा शेतमाल शेतातच आहे. त्यातच मराठवाड्यात रविवारी (ता. १०) काही तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवरही पाणी फेरले गेले. 

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वीज पडल्याने सहा, तर उदगीर तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोळेगाव, माळेगाव, पिंपळगाव रेणुकाई, तर बदनापूर तालुक्यातील शेलगाव, उज्जैनपुरी, अकोला, धोपटेश्‍वर भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बीडमध्येही आंबा, पपईची झाडे मोडून पडली, तर फळेही गळाली. टरबूज, खरबूज पिकांनाही मोठा फटका बसला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील काही गावांत गारपीट झाली. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
 
औरंगाबाद 

 • औरंगाबाद शहरातील काही भागांत हलका पाऊस 
 • शहराच्या परिसरातील काही गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, गारपीट 
 • चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) परिसरात दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस. 
 • आडूळ (ता. पैठण) येथे दुपारी तीन ते साडेतीनदरम्यान वादळी वारे, गारपिटीसह पाऊस. मोसंबी, डाळिंब बागांसह भाजीपाल्याचे नुकसान. 
 • विहामांडवा (ता. पैठण) येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊण तास वाऱ्यासह पाऊस. 
 • फुलंब्री शहरासह तालुक्यातील बाबरा, आळंद, तळेगाव, जळगाव मेटे येथे पाऊस. 
 • गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) परिसरात विजांच्या कडकडाटासह दुपारी दोनच्या सुमारास पाऊस. वीजपुरवठा खंडित. 
 • महालगाव (ता. वैजापूर) परिसरात दुपारी पावसाच्या हलक्या सरी. 
 • उपळी (ता. सिल्लोड) परिसरात दुपारी पाऊस. 
 • लिंबेजळगाव (ता. गंगापूर) परिसरात अडीचच्या सुमारास पाऊस. 

अस्वस्थ वर्तमान 

 
जालना 

 • जालना जिल्ह्यात काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी 
 • भोकरदन तालुक्यातील कोळेगाव, माळेगाव, पिंपळगाव रेणुकाई भागात गारपीट 
 • जालना व जाफराबाद, परतूर तालुक्यांत पावसाचा शिडकावा 
 • बदनापूर तालुक्यात शेलगाव, उज्जैनपुरी, अकोला, धोपटेश्‍वर भागात वादळी वाऱ्यासह गारा 
 • वादळी वारा व गारपिटीमुळे भोकरदन व बदनापूर तालुक्यांतील फळबागांच्या नुकसानीची शक्यता 
 • अंबड, घनसावंगी तालुक्यांत ढगाळ वातावरण, रिमझिम. 

 
लातूर 

 • लातूर जिल्ह्यात चाकूर, उदगीर, औसा, 
 • शिरूर अनंतपाळ तालुक्यांत पावसाची हजेरी 
 • चाकूर तालुक्यात वीज पडल्याने सहा जनावरांचा मृत्यू 
 • उदगीर तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली 
 • औशात जोरदार पावसाची हजेरी 
 • उजनीमध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस 

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली


बीड जिल्हा 

 • प्रचंड उकाड्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा 
 • वादळ, गारा व अवकाळी पावसाने फळपिकांचे मोठे नुकसान 
 • आंबा, पपईची झाडे मोडून पडली, तर फळेही गळाली 
 • टरबूज व खरबूज पिकांनाही मोठा फटका 

 
उस्मानाबाद 

 • केसरजवळगासह परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस 
 • वाशी, कळंब तालुक्यांतील काही गावांत पावसाच्या हलक्या सरी 

 
नांदेड जिल्हा 

 • नांदेड शहरात पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस 
 • जिल्ह्यातील वाई बाजार, कुरुळा येथे मेघगर्जनेसह, तर नायगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस 
 • मारतळ्यासह परिसरात रात्री वाऱ्यासह जोरदार पाऊस. 
 • मुखेड शहर व परिसरात पहाटे चारच्या सुमारास मेघगर्जनेसह अर्धा तास पाऊस 
 • रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.७७ मिलिमीटर पावसाची नोंद. 
 • महामार्गावरील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. 
 • मुक्रमाबादजवळील मारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवरील टिनपत्रे उडाले. 
 • सावरमाळ येथील एका घरावर वीज पडली. सुदैवाने जीवितहानी नाही 
 • अनेक गावे, वाडी, तांड्यांवर वीजपुरवठा करणारे खांब वाकले 
 • वळंकी येथील बाबूराव बिरादार यांची म्हैस वीज पडून दगावली 
 • बरबडा परिसरात अवकाळीने उन्हाळी रब्बी पिकांचे नुकसान 

परभणी  

 • परभणी, जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यांत शनिवारी (ता. नऊ) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस 
 • परभणी, जिंतूर तालुक्यांत मध्यरात्री वादळी वाऱ्यामुळे शेत आखाड्यासह फळबागांचे नुकसान, तब्बल अर्धा तास गारांचा पाऊस 
 • टाकळी बोबडे, जोडपरळी (ता. परभणी) या शिवारात सर्वाधिक नुकसान 
 • वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित 

 
हिंगोली 

 • वसमत तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पाऊस 
 • मध्यरात्री गिरगाव, खाजमापूरवाडी, सोमठाणा, मुरूंबा, पार्डी, कुरुंदा, कुरुंदावाडी, कोठारी; तसेच हयातनगर व परिसरातील गावांत मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस. 
 • वादळी वाऱ्याने शेतातील आखाड्यांवरील टिनपत्रे उडाले. 
 • हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. 
   
loading image
go to top