ऊर्मिला मस्केचा बीडमध्ये हुंड्यासाठी खून; पतीसह पाच जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

ऊर्मिलाचा भाऊ सर्जेराव देवळे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बारा वर्षांपूर्वी ऊर्मिला आणि रमेश यांचा विवाह झाला. लग्नात ८५ हजार रुपये हुंडा ठरला होता. त्यापैकी ५० हजार दिले होते. तर ३५ हजार रुपये बाकी होती. त्यामुळे सासरच्या मंडळींकडून सतत छळ केला जात होता.

बीड - लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी राहिलेल्या ३५ हजार रुपयांच्या हुंड्यापायी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, दीर व जावू अशा पाच जणांविरोधात गुन्हा नोंद झाला. आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. शुक्रवारी (ता. २९) रात्री ऊर्मिला मस्के हिचा कत्तीचे वार करून पती रमेश मस्के याने जालना रोडवर खून केला होता. 

याप्रकरणी ऊर्मिलाचा भाऊ सर्जेराव देवळे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बारा वर्षांपूर्वी ऊर्मिला आणि रमेश यांचा विवाह झाला. लग्नात ८५ हजार रुपये हुंडा ठरला होता. त्यापैकी ५० हजार दिले होते. तर ३५ हजार रुपये बाकी होती. त्यामुळे सासरच्या मंडळींकडून सतत छळ केला जात होता. याप्रकरणी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रारही देण्यात आली होती; तसेच शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ऊर्मिलाचे नांदणे मोडेल म्हणून प्रकरण तडजोड करून मिटविले.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

दरम्यान, ऊर्मिलास शुभम (वय १०), समर्थ (वय आठ) अशी दोन मुले झाली. दिवाळीसाठी ऊर्मिला माहेरी आली. परत तिला वडिलांनी सासरी सोडल्यानंतर सासरच्या मंडळींनी तू परत कशाला आलीस म्हणत मारहाण केली. त्यानंतर परत ऊर्मिला एक महिना माहेरी राहिली. काही नातेवाइकांनी मध्यस्थी केल्यानंतर ऊर्मिला सासरी आली. दरम्यान, शुक्रवारी रात्री रमेश सर्जेराव मस्के याने पत्नीवर कत्तीने वार करून खून केला. शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश मस्केसह सासरे वैजिनाथ मस्के, सासू चंद्रकला मस्के, दीर गणेश मस्के, जाऊ सारिका मस्के यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

कत्तीने केले २९ वार 
दरम्यान, जादूटोणा, करणी केली म्हणून ऊर्मिला सतत वाद घालत रात्रभर झोपतही नसे. त्यामुळे आई-वडिलांपासून वेगळं राहिल्यानंतरही वाद थांबले नाहीत. अखेर वैतागून दिवसभर ठरवून रात्री तिला दुचाकीवरून जालना रोडला नेले व कत्तीने तिच्या मानेवर २९ वार केले, अशी कबुली आरोपी रमेश मस्के याने दिली. खुनानंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Muske's murder for dowry in Beed; Crime against five people including husband