उमरग्यामध्ये पोलिसांनी तब्बल 21 लाखांचा गुटखा पकडला

अविनाश काळे
Wednesday, 30 December 2020

गुटखा व टेंपोसह एकूण तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद): शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर उमरगा पोलिसांनी गुटखा पकडला. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान हैद्राबादकडे जाणाऱ्या गुटख्याचा आयशर टेंपो पोलिसांनी सापळा रचुन पकडला. यात २१ लाखाचा गोवा -१००० या प्रकारच्या गुटख्याच्या ३० गोनी मिळून आल्या. गुटखा व टेंपोसह एकूण तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस व अन्न सुरक्षा विभागाने सांगितलेली माहिती अशी की, उमरगा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस उपनिरिक्षक अमोल मालुसरे यांनी शहराच्या बायपास रोडवर सापळा रचला. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान आयशर टेंपो क्रमांक (केए ०१ ए.ई.१४६५) आला, त्याची तपासणी केली असता त्यात गोवा १००० या हजार नावाच्या गुटखा असल्याने टेंपो ठाण्यात आणण्यात आला.

धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोदकुमार काकडे यांना माहिती कळविण्यात आली. बुधवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. काकडे यांनी टेंपोची तपासणी करून रितसर तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टेंपोमध्ये  गुटख्याच्या ३० गोनी मिळून आल्या असून या प्रकरणी टेंपो चालक सय्यद अफसर सय्यद मझहर सय्यद रा. बेंगलोर याला अटक करण्यात आली आहे.

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. मालुसूरे, कर्मचारी प्रताप बांगर, शुभम दिवे, संभाजी घुले, बाबासाहेब कांबळे यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान अन्न सूरक्षा अधिकारी श्री. काकडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Usmanabad Police in Umarga nabbed 21 lakh gutkha