नाईचाकूरात पती - पत्नी दोघांचा विजय! एकमेकांना भरवला पेढा

अविनाश काळे
Monday, 18 January 2021

निवडणूकीत शिवसेना - काँग्रेसच्या आघाडीला दहा, बंडखोर शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले

उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील नाईचाकूर ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तेरा जागेसाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेना - काँग्रेस आघाडीने दहा जागा जिंकून बहुमत स्पष्ट केले. दरम्यान दोन वेगवेगळ्या प्रभागातुन निवडणूक लढविलेल्या बालाजी पवार व त्यांच्या पत्नी उषाबाई पवार निवडून आल्या आहेत. दोघांनी  एकमेकांना पेढे भरून विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

नाईचाकूर येथे शिवसेना व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन आघाडी केली होती. तर शिवसेनेच्या दुसऱ्या गटातील नामदेव पवार यांचे आठ तर दिलीप पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने नऊ जागेवर उमेदवार उभे केले होते. या निवडणूकीत चाणाक्ष मतदारांनी काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग केली तर बऱ्याच ठिकाणी सक्षम उमेदवाराला अमूल्य मत दिले.

जळकोट तालु्क्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

निवडणूकीत शिवसेना - काँग्रेसच्या आघाडीला दहा, बंडखोर शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. केशव पवार, शेषेराव पवार, माणिकबापू पवार, रमेश पवार, रावसाहेब पवार, राजेंद्र डिगोळे, बाबुराव शहापूरे आदी जेष्ठ मंडळी गावातून काढलेल्या विजयी मिरवणूकीत सहभागी झाले होते. दरम्यान पंचायत समितीची निवडणूक लढवलेल्या सौ. उषा बालाजी पवार  प्रभाग क्रमांक चार  मधून तर त्यांचे पती बालाजी काशीनाथ पवार प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून आले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usmanabad political news umarga husband wife elected in election