पोस्टात साडेतीन हजार पदे; दहावी उत्तीर्णांसाठी मोठी संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

  • डाकपाल, सहायक डाकपाल, डाकसेवकांच्या पदांची भरती 
  • ऑनलाइन भरतीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमधील शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाकसेवकांच्या रिक्त पदांची ऑनलाइन भरती होत आहे. देशभरात पोस्टातर्फे जम्बो भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात महाराष्ट्रात 3650 जागा देण्यात आलेल्या आहेत.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे. दहा हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत पगार डाकपाल आणि सहायक डाकपाल यांना असणार आहे. सदर ऑनलाइन भरतीसाठी उमेदवारांनी https://www.indiapost.gov.in या किंवा https://appost.in/gdsonline/ या संकेतस्थळाला भेट द्यावी; तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व ग्राह्य धरले जाणार नाहीत.

हेही वाचा - बायको छळतेय? इथे मिळेल आधार

शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाकसेवकांच्या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ओसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क आहे. सर्व महिला, सर्व एससी, एसटी व सर्व अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे.

क्लिक करा - कन्याशाळेबाहेर लावली बघा लैंगिक समस्यांची जाहिरात

परिसर मुलाखती, विद्यार्थी मेळावा 

औरंगाबाद : वसंतराव नाईक महाविद्यालयात पदवीप्राप्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा गुरुवारी (ता.21) होणार असून शनिवारी (ता. 23) परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती व नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले. 

शनिवारी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेदरम्यान परिसर मुलाखती होणार आहेत. परिसर मुलाखतीसाठी एनआयआयअी मुंबई आणि आयसीआयसीआय बॅंकेतर्फे प्रतिनिधी येणार आहेत. यासाठी शैक्षणिक वर्ष 2016 ते 2019 दरम्यान पदवीप्राप्त विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.

उघडून तर बघा - तरुणींना, महिलांना छेडता? आता बघा

मुलाखतीसाठी येताना विद्यार्थ्यांनी दहावी ते पदवीपर्यंतचे गुणपत्रक व प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे सोबत आणावीत. मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. जगदीश भराड यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacancy in Post Office, Aurangabad Jalna News