राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड; 4 ते 5 जणांकडून दगडफेक

rajesh tope
rajesh tope

जालना- माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून घोषणाबाजी करत टोपेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याची माहिती आहे. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर टोपे यांची गाडी थांबली होती. यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता अशी माहिती मिळत आहे. टोपे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

rajesh tope
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा - राजेश टोपे

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जातं. अज्ञातांनी कारच्या समोरील काचेवर दगड मारला. कारवर ऑईलही फेकल्याचं समजतं. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

rajesh tope
Rajesh Tope Video : राजेश टोपे झाले रोमँटीक; पत्नीसाठी गायलं…

माजी आरोग्य मंत्री टोपे यांनी या हल्ल्याप्रकरणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना जबाबदार धरलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा त्यांनी आरोप केलाय. या गोष्टीचा त्यांनी निषेध केला आहे. दरम्यान, लोणीकर यांच्या घरावरही दगडफेक झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com