esakal | उमरगा तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident In Umarga Block

राष्ट्रीय महामार्गावर जकेकुर गावाजवळ दोन मालवाहु टेम्पोची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.आठ) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

उमरगा तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात आठ जण जखमी

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर जकेकुर गावाजवळ दोन मालवाहु टेम्पोची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.आठ) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.  या बाबतची माहिती अशी की, किराणा साहित्याची वहातूक करणारा उमरगा येथील टेम्पो हा जकेकूर ये येथे किराणा साहित्य घेऊन जात होता. तेव्हा सोलापूरहुन हैदराबादच्या दिशेने निघालेला टेम्पो (टीएन ३९ सी वाय ४९७२) यांची समोरासमोर धडक होऊन तिघे गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर किराणा साहित्याचा टेम्पो उलटल्याने आज पहिल्याच दिवशी टेम्पोवर चालक म्हणून जाणारे सुग्रीव बळीराम जाधव (वय  ५५, रा. उमरगा) माऊली श्रीधर माने (वय २२, रा. चिंचोली जहागीर ता. उमरगा), सिराज जिंदावली शेख (वय १९, रा. उमरगा) हे तिघे जखमी झाले. दरम्यान या अपघाताची माहीती मिळताच उमरगा - चौरस्ता येथे थांबणारी नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. चालक शेषेराव लवटे यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने जखमीवर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान मंगळवारी चारच्या सुमारास जकेकूर - चौरस्ता जवळ उभारलेल्या क्रूझर जीपला ट्रकने धडक दिल्याने तीन महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती सांगण्यात आली.

लातूर मार्गावर लक्ष्मी पाटीजवळ ट्रॅक्टर - कारचा अपघात
देगलुरहून ते उमरग्याकडे येणारी कार व खडीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक होऊन दोघे जखमी झाल्याची घटना लातूर मार्गावर लक्ष्मी पाटीजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. या अपघातात चालक कपील बालाजी साखरे (वय ३०,रा. मुखेड, जि.नांदेड), गणेश राजन्ना आनमुलवार (वय ३०, रा. देगलुर )या जखमी दोघांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संपादन - गणेश पिटेकर