esakal | पहिल्याच दिवशी परभणीत लालपरीकडे प्रवाशांनी फिरविली पाठ... 
sakal

बोलून बातमी शोधा

lal pari

 

 

परभणी ः एसटी महामंडळाने शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवेला परवानगी देत प्रत्येक तालुकास्तरावर गाड्या पाठविण्याचे नियोजन केले. परंतू, एसटीच्या या सेवेकडे पहिल्या दिवशी प्रवाशी फिरकलाच नाही. त्यामुळे दोन - चार प्रवाश्यांना घेवून एसटी बस चालवावी लागली.

पहिल्याच दिवशी परभणीत लालपरीकडे प्रवाशांनी फिरविली पाठ... 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः एसटी महामंडळाने शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवेला परवानगी देत प्रत्येक तालुकास्तरावर गाड्या पाठविण्याचे नियोजन केले. परंतू, एसटीच्या या सेवेकडे पहिल्या दिवशी प्रवाशी फिरकलाच नाही. त्यामुळे दोन - चार प्रवाश्यांना घेवून एसटी बस चालवावी लागली.

कोरोना विषाणूच्या ससंर्गानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सलग दोन महिणे एसटीची बससेवा बंद राहिली. गुरुवारी (ता.२१) सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेत एसटीला तसे आदेश दिले. त्यामुळे परभणी या जिल्हा ठिकाणावरून तालुकाच्या ठिकाणी शुक्रवार (ता.२२) सकाळपासून बससेवा सुरु करण्यात आली. 

हेही वाचा - अन् अत्तराच्या सुगंधाची दरवळही झाली कमी 

परभणी आगारातून एकूण ७० फेऱ्या 
परभणी आगारातून रोज परभणी-सेलू मार्गावर १६ फेऱ्या होत आहेत. तर परभणी-पालम १८, परभणी-लोहरा १२ फेऱ्या, परभणी-कुंभारी १२ अशा एकूण ७० फेऱ्या होणार आहेत. या बसेस एकूण दोन हजार २८८ किलोमीटर धावणार आहेत. या प्रमाणेच जिंतूर आगारातून जिंतूर-परभणीच्या ये-जा करणाऱ्या २० फेऱ्या तर जिंतूर-सेलू मार्गावर १६ अशा एकूण ३६ फेऱ्यातून बस एक हजार ६१६ किलोमीटर धावणार आहेत. 

हेही वाचा - प्रकल्पांतील पाणीसाठ्यामुळे परभणी जिल्ह्याला यंदा ‘नो टेन्शन’ 

गंगाखेड आगाराच्या सात बस धावल्या 
गंगाखेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात सर्वात प्रथम परभणी जिल्ह्यातील सीमा सील करून लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे परभणी जिल्ह्यासह गंगाखेड येथील लालपरीसही लाॅकडाउन करण्यात आले होते. यानंतर शुक्रवारी लालपरी अखेर रस्त्यावर धावली. लाॅकडाउनच्या दरम्यान दळणवळणात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने पूर्णतः बंद करण्यात आले होते. यामध्ये लालपरीचा ही समावेश होता. परंतु, लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊन जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्यात यावी, असा निर्णय झाल्यानंतर तब्बल ६० दिवसानंतर गंगाखेड आगारातून राणीसावरगाव येथे तीन बस व परभणी येथे चार बस सोडण्यात आल्या. परंतु, गंगाखेड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह महिला सापडल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासास तितकासा प्रतिसाद न देता सध्या स्थितीला घरातच राहणे पसंत कले आहे.