Nanded Photo
Nanded Photo

Video : ग्रीन झोनमधील उद्योग-व्यवसाय सुरु व्हावेत

नांदेड : नांदेड शहरात अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, हे नांदेड जिल्ह्याचे सुदैव आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाही म्हणजे कुठलिही खबरदारी घ्यायची नाही असे नव्हे, तर कोरोना आजाराचा प्रादूर्भाव कमी होईपर्यंत सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्था वरचेवर ढासळत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांना सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अमलबजावणीची सक्ती करून सुरु करण्यास मुभा द्यावी असे तरुण उद्योजक सागर भातावाले यांनी ई-सकाळशी बोलताना सांगितले.

त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने लहान मोठ्या उद्योग व व्यवसायिकांनी धसकी घेतली आहे. त्यांच्यासोबत कामगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली असून, आपल्यावर उपासमारीची तर वेळ येणार नाही ना? अशा विवंचनेत हे कामगार आज घरातच बसून आहे. ग्रीन झोनमधील उद्योगांना थोडी मुभा दिली तर त्यांच्यामध्ये आशेचा किरण दिसेल, असेही श्री. भातावाले यांनी सांगितले.

हेही वाचा- शिवसेनेचे दत्ता पा. कोकाटेंकडून १०० क्विंटल तांदूळ वाटप
उद्योग व्यवसायाचे अवसान गळुन पडणार नाही

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स खुप गरजेचे आहे. नांदेड शहर व तालुक्यात इंडस्ट्रीजमध्ये बोटावर मोजण्या इतकेच उद्योग धंदे सध्या सुरु आहेत. बहुतेकच उद्योग-व्यवसाय सध्या बंदावस्थेत आहेत. लॉकडाऊमुळे मागील २० ते २५ दिवसांपासून उद्योग धंदे कुलुपबंदावस्थेत आहेत. पुढील काळात देखील उद्योग व्यवसाय असेच बंद राहिल्यास जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाचे अवसान गळुन पडेल. त्यांचे न भरुन निघणारे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचले पाहिजे- कोरोना मुक्ती साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे
कामगारांच्या परीवारावर पोटापाण्याचा प्रश्न आहे

उद्योग व्यवसायावर आधारीत अनेक कामगांच्या हाताला आज कामे नाहीत. त्यांच्या एक वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परप्रांतियांना तरी जेवणाची सुविधा उपलब्ध होत आहे. मात्र मागील २० दिवसांपासून घरी बसलेल्या कामगारांच्या परीवाराची मात्र उपासमारी होत आहे. याकडे देखील शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जिथे कामगार कमी आहेत. अशा लघु उद्योगाना लॉकडाऊनमुधुन सवलत देण्यासाठी विचार व्हावा, अशीही मागणी श्री. भातावाले यांनी यावेळी केली.

सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करु
नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये येतो. त्यामुळे इथे सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत लहान मोठे उद्योग सुरु करण्याची मुभा दिली जावी. यासाठी जिल्हा प्रशानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करावी. असे केले तरच आर्थिक डबघाईस आलेल्या उद्योग व्यवसायांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल.
- सागर भातावाला, (मॉ साहेब दातार कोल्ड स्टोरेज)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com