व्हिडिओ- जिल्हाधिकारी म्हणतात ‘सागर जैसी ऑंखोवाली...’

Ruchesh Jaywanshi
Ruchesh Jaywanshi

हिंगोली: येथील जिल्‍हा परिषदेतर्फे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण शनिवारी (ता.२३) महावीर भवन येथे जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गिटारवर ‘सागर’ चित्रपटातील ‘चेहरा है या चाँद खिला है,... सागर जैसी ऑंखोवाली, ये तो बता तेरा नाम है क्या,’ हे गाणे सादर केले. खुद्द जिल्हाधिकारी गिटार वादन करून गाणे गात असल्याने सर्वच आचंबित झाले. या गाण्यावर उपस्थितांनी वन्समोअर मागितला.

अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारा सततचा ताण तणाव दूर व्हावा यासाठी सततच्या कामातून थोडासा विरंगुळा म्हणून महसूल विभागाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने तीनदिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन दिवस झालेल्या स्पर्धेचा शनिवारी महावीर भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करून समारोप करण्यात आला. तीनदिवसीय स्पर्धेत क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी या सांघिक क्रीडा स्पर्धेसह वैयक्तिक स्‍पर्धा घेण्यात आल्या.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम

यात थालिफेक, गोळा फेक, भाला फेक, धावणे आदी स्पर्धांचा समावेश होता. पुरुषांबरोबर महिलांनीही हिरीरीने सहभाग घेतला होता. याशिवाय समूह गायन, एकपात्री नाटिका, वैयक्तिक गायन, सांघिक नाटिका याचे अप्रतिम सादरीकरण कर्मचाऱ्यांच्या संघाने केले. शनिवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

उपस्थितांची मिळविली दाद

या वेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनादेखील गीत सादर करण्याचा मोह आवरता आला नाही. श्री. जयवंशी थेट हातात गिटार घेऊन स्‍टेजवर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्‍थितांची दाद पाहता श्री. जयवंशी यांनीदेखील ‘सागर’ चित्रपटातील गीतावर ताल धरला. ‘चेहरा है या चाँद खिला है...’ हे गीत सादर करतात उपस्थितांनी टाळ्या वाजवून तेवढीच दाद दिली. तसेच वन्समोअर, वन्समोअर असा एकच जल्‍लोष ऐकावयास मिळाला.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा उत्साह

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनिष आखरे, माजी अध्यक्षा शिवराणी नरवाडे, महिला बाल कल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, समाज कल्याण सभापती फकिरा मुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, वित्त व लेखाधिकारी डॉ. हिवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, बाळासाहेब मगर, ॲड. बाबा नाईक यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, जिल्‍हा परिषद सदस्य, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com