Video- लॉकडाउनचे नियम पाळा अन्यथा...- एसपी मगर

फोटो
फोटो

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास मदत केली. आता फक्त काही दिवस लॉकडाउनचा त्रास सहन करा, घरातून बाहेर पडू नका, ही लढाई आपण ७० ते ८० टक्के जिंकलो आहोत. त्यासाठी अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांची व संबंधीताची बुधवार (ता. १५) पासून कसुन चौकशी केल्या जाईल. स्थानिक नेत्यांनीही अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली शहरात रिकामटेकडे फिरणाऱ्यांची शिफारस करु नये. येणाऱ्या काळात लॉकडाउन कडक केल्या जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.

कोरोना या वैश्‍विक महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नांदेडकरांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला दिलेले सहकार्य अभिनंदनीय आहे. मात्र या आजाराचे पाय महाराष्‍ट्रात अधिकच बळकट होत असल्याने १४ एप्रिलपर्यंत लावण्यात आलेले लॉकडाउन परत तीन मेपर्यंत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना आपल्या घरातच थांबायचे आहे. आपली एक चुक आपणास खूप महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने त्याचा फटका नांदेड जिल्ह्याला बसु नये म्हणून तेलंगना सिमा बंद करण्यात आल्या आहेत. 

पोलिस कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही

नांदेड शहरातही अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली रिकामटेकड्यांचा संचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे लॉकडाउन हे अधिक कडक करण्यात येत आहे. नांदेडकरांनी फक्त काही दिवस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करत श्री. मगर म्हणाले की, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली आपल्या वाहनांवर स्टीकर लावून किंवा गळ्यात आयकार्ड वापरुन कामाशिवाय घराबाहेर पडत असल्याचे चौकशीत उघड झाले आहेत. तसेच त्यांची वाहने सोडण्यासाठी काही स्थानिक नेतेमंडळी पोलिसांवर दबाव आणत आहेत. मात्र पोलिस कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसुन येणाऱ्या काळात लॉकडाउन कडक केले जाणार आहे. 

अफवा पसरविणाऱ्यांवर सायबरचे आहे लक्ष 

तसेच व्हाटसअपच्या माध्यमातून अफवा पसरवणे, काही समाजाच्या भावना दुखावने तसेच महिलांबद्दल अपशब्द वापरणे अशा घटना घडत आहेत. त्यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवून असून अशा प्रकरणात जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात दक्षता समिती स्थापन केली असून गावात नविन आलेल्या व्यक्तीबद्दल ही समिती निर्णय घेणार आहे. आपल्या घरी नवीन पाहूण्याला सध्या तरी बोलावू नका किंवा जावू नका असे आवाहन श्री. मगर यांनी केले आहे. 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com