Vidhan Parishad Election : देगलुरात विधान परिषद निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान; देगलूरच्या ३१ तर मुखेडच्या २३ सदस्यांनी केले मतदान

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येथील तहसील कार्यालयात गुरुवार ता. १८ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.
Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election

sakal
Updated on

देगलुर - नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येथील तहसील कार्यालयात गुरुवार ता. १८ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ ते चार ही वेळ असली तरी दुपारी दोन वाजेपर्यंतच 100% मतदान पूर्ण झाले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार अमर राजुरकर यांना तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर, तर वचिंत कडुन प्रशांत इंगोले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com