गूढ आवाजाने ग्रामस्‍थ झाले भयभीत... कुठे वाचा

राजेश दारव्हेकर
Sunday, 26 April 2020

पांगरा शिंदे येथे अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. रविवारीही आवाज येतात ग्रामस्थांनी घरातून बाहेर पळ काढला. या आवाजाने कोणतेही नुकसान झालेली नाही. या आवाजाचे गूढ मात्र अद्याप उकलले नाही.

हिंगोली : पांगरा शिंदे (ता. वसमत) परिसरातील गावांत रविवारी (ता. २६) सकाळी ८.१० वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. वारंवार गूढ आवाज होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून अद्याप आवाजाचे गूढ उलगडले नाही. दरम्यान, सिंदगी, पोतरा (ता. कळमनुरी) येथे खासदार हेमंत पाटील यांनी भेट देवून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

पांगरा शिंदे येथे अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. पूर्वी वर्ष ते सहा महिन्याला आवाज येत असत. त्यानंतर तीन ते चार वर्षे कधी आठ दिवसाला ; तर कधी पंधरा दिवसाला आवाज येत होते. चार ते पाच महिन्यांनंतर रविवारी आठ वाजून दहा मिनिटांनी पुन्हा जमिनीतून गूढ आवाज आला.

हेही वाचा - Coronavirus - युरोपातून बीडच्या युवकाचा तो व्हिडिओ आला, महाराष्ट्र खडबडून जागा झाला...

कोणतेही नुकसान नाही

वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, कळमनुरी तालुक्‍यातील सिंदगी, जांब, पोतरा या गावांतदेखील जमीन हादरल्याचे ग्रामस्थांनी अनुभवले. आवाज येतात ग्रामस्थांनी घरातून बाहेर पळ काढला. या आवाजाने कोणतेही नुकसान झालेली नाही. पांगरा शिंदे येथे सकाळी ८.१० मिनिटाला जमिनीतून गूढ आवाज आला.

टीनपत्रांचा आला आवाज

 तसेच अनेकांच्या घरावरील टीनपत्रांचा खडखड असा आवाज आल्याचे संतोष शिंदे, सुदर्शन शिंदे यांनी सांगितले. पोतरा, सिंदगी येथेही आवाज आल्याचे जानकिराम आप्पा रणखांब, दशरथ मुलगीर, बालाजी भुसनर यांनी सांगितले. दरम्‍यान, पांगरा शिंदे येथील गूढ आवाजाबाबत नांदेड येथील स्‍वारातीम विद्यापीठातील तज्ज्ञांनी दोन वर्षांपूर्वी भेट देऊन पाहणी केली होती.

हादऱ्याची कोणतीही नोंद नाही

 मात्र, आवाजाचे गूढ उकलले नाही. तसेच जिल्‍हा आपत्ती व्यवस्‍थान कक्षालाही ग्रामस्‍थांनी कळविले आहे. रविवारी आलेल्या गूढ आवाजाबाबत जिल्‍हा आपती व्यवस्‍थापन अधिकारी रोहित कंजे यांना विचारणा केली असता, आवाज आल्याची किंवा भूकंपाच्या हादऱ्याची तशी कोणतीही नोंद नसल्याचे त्‍यांनी सांगितले. मात्र, पांगरा शिंदेसह परिसरातील गावांत अनेक दिवसांपासून गूढ आवाज होत आहेत. आवाजाचे गूढ उकलून मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

येथे क्लिक करा - Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

आवाजाचे गूढ उकलेना

पांगरा शिंदे येथे गूढ आवाज येण्याची मालिका कायम आहे. यापूर्वी अनेक वेळा आवाज आले आहेत. रात्री-बेरात्री आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी काही पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे जनजागृतीही केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers became frightened by the mysterious sound Hingoli News