GramPanchayatElection: कामासाठी मतदार बाहेरगावी; सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी  

शिवशंकर काळे
Saturday, 9 January 2021

फेसबुक व व्हॉट्सॲपवर पॅनलचे पोलचीट टाकल्यास सगळीकडे पाहावयास मिळते. बाहेरील नागरिकांना यांची माहिती मिळवून मतदान कोणाला करायचे यांचा अंदाज येतो.

जळकोट (जि.लातूर) : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ सहा दिवस उरले असून पॅनल प्रमुखांच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सॲप व फेसबुकवरुन पोलचीट टाकून प्रचाराची रणधुमाळी उठवली  जात आहे. तालुक्यातील हजारो मतदार हे कामासाठी बाहेरगावी आहेत. त्यांना आपल्या गावात कोणत्या पॅनलकडून कोणता उमेदवार व कोणत्या वॉर्डातून थांबला हे त्यांनाही माहिती नसतेही. बाहेर गावाकडील मंडळी हे ता.पंधरा मतदानादिवशी गावात सकाळी येतात.

जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

लगेच मतदान करुन ते आपल्या कामासाठी पुन्हा बाहेर गावी निघून जातात. फेसबुक व व्हॉट्सॲपवर पॅनलचे पोलचीट टाकल्यास सगळीकडे पाहावयास मिळते. बाहेरील नागरिकांना यांची माहिती मिळवून मतदान कोणाला करायचे यांचा अंदाज येतो. त्यामुळे सध्या फेसबुक व व्हॉट्सॲपवर तालुक्यातील निवडणूक लागलेल्या अनेक गावच्या पॅनल प्रमुखांच्या कार्यकर्त्यांकडून पोलचीट टाकून प्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे.

महावितरणामुळे शेतकऱ्याला मुकावा लागला जीव; वीजेच्या धक्क्याने मृत्यू, कुटुंबीय संतप्त 

ग्रामपंचायत निवडणुकीत एका एका मताला महत्त्व असते. सध्या तालुक्यात तिरंगी, चौरंगी लढत साठ टक्के गावे आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या कमी असल्यामुळे दहा वीस मतावर उमेदवार विजयी होण्याची संधी आहे. बाहेर गावाकडुन येणाऱ्या मताचा अनेकांना फायदा होणार तर काहीना तोटाही होणार आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीतील पॅनल प्रमुखांनी व्हॉट्सॲप, फेसबुक बरोबर मिळालेल्या चिन्हे यांचे व्हिडीओ बनवून व्हॉट्सॲप फिरुन प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.अनेक व्हिडीओत गावच्या विकासाच्या गप्पा सांगत असल्याचे दिसून येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters Outside, Election Campaign In Social Media Gram Panchayat Election