महावितरणामुळे शेतकऱ्याला मुकावा लागला जीव; वीजेच्या धक्क्याने मृत्यू, कुटुंबीय संतप्त 

अनिल जमधडे
Saturday, 9 January 2021

आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम माणिकराव पठाडे (वय ५२) हे २७ डिसेंबर रोजी शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अकरा केवी क्षमतेच्या विद्युत खांबाला स्पर्श झाला.

ओरंगाबाद : आडगाव सरक येथील शेतकऱ्याचा उच्चदाब वाहिनीच्या विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतल्याने शनिवारी ( ता.नऊ) तणाव निर्माण झाला.  आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम माणिकराव पठाडे (वय ५२) हे २७ डिसेंबर रोजी शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अकरा केवी क्षमतेच्या विद्युत खांबाला स्पर्श झाला.

शिवसेना म्हणते, संभाजीनगर आणि कॉंग्रेस म्हणते औरंगाबाद; भाजपच्या राजू शिंदेंचा टोला

त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने ते खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हातामधील पेशी मृत झाल्याने त्यांना डावा हातही काढून टाकावा लागला होता. खासगी रुग्णालयात ३ ते ४ लाख रुपये खर्च झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पठाडे कुटुंबीयांनी रुस्तम यांना घाटी रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरू असतांना आठ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी शनिवारी सकाळपासून घाटी रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी केली होती. मृतदेह महावितरणच्या मुख्यालयात घेऊन जाणार अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. या घटनेच्या अनुषंगाने महावितरण'च्या मिल कॉर्नर येथील मुख्यालयासमोर प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. घाटी रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

घरातील पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा अंत, तोल गेल्याने घडली दुर्दैवी घटना

पोलिसांनी कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पाच जणांच्या शिष्टमंडळ घेऊन महावितरण'च्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली. दरम्यान पठाडे कुटुंबियातील दोघा जणांना महावितरणमध्ये सामावून घ्यावे तसेच दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी कुटुंबियांनी लावून धरली. दुपारी उशिरापर्यंत पोलिस पठाडे कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

आडगाव सरक येथील घटनेबद्दल महावितरणला संवेदना आहेतच. या घटनेचा तपशील वार अहवाल विद्युत उपनिरीक्षककडे पाठविण्यात आलेला आहे.  शवविच्छेदन अहवालानंतर भरपाई देण्याच्या संदर्भात महावितरण सकारात्मक पावले उचलेल. 
- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Shock Claims Farmer Aurangabad Marathi News