esakal | उमरगा तालुक्यात ७७.०४ टक्के मतदान, मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

तालुक्यातील ४९ पैकी मुळज, बलसूर, जकेकुरवाडी, भिकारसांगवी, कोळसूर (गुंजोटी), जकेकूर, एकोंडी (जहागीर), मातोळा, चिंचकोटा, बाबळसूर, पळसगाव या अकरा ग्रामपंचायती बिनविरोध आल्या.

उमरगा तालुक्यात ७७.०४ टक्के मतदान, मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर!

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.१५) सर्वाधिक ७७.०४ टक्के मतदान झाले. ३०४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात  बंद झाले असून सोमवारी (ता.१८) सकाळी अंतु- बळी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणीनंतर उलगडा होईल. दरम्यान आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सात गावांत ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

तालुक्यातील ४९ पैकी मुळज, बलसूर, जकेकुरवाडी, भिकारसांगवी, कोळसूर (गुंजोटी), जकेकूर, एकोंडी (जहागीर), मातोळा, चिंचकोटा, बाबळसूर, पळसगाव या अकरा ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. ३८ ग्रामपंचायतींसाठी एकुण ६७ हजार १२२ मतदारांपैकी २७ हजार ३७९ पुरूष तर २४ हजार ३३१ स्त्री मतदार असे एकुण ५१ हजार ७११ मतदारांनी (७७.०४) मतदान केले. दरम्यान तलमोड, समुद्राळ, बोरी, हंद्राळ, भगतवाडी, मूरळी, कदमापूर येथे ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. तर नाईचाकूरात ६७.८२ टक्के मतदान झाले.


ग्रामपंचायतीनिहाय एकुण मतदार, कंसात झालेले मतदान व टक्केवारी : सावळसुर एक हजार ११४ (८८०, ७८.९९), कदमापूर / दुधनाळ एक हजार २७ ( ८४९, ८२.६६), कदेर तीन हजार ९३५ ( दोन हजार ९०६, ७३.८५), तुरोरी पाच हजार ९३४ ( चार हजार ३५५, ७३.३९), व्हंताळ एक हजार ३७८ (एक हजार १३०, ८२.००), दाळींब सहा हजार २२४ ( चार हजार ७८६, ७६.८९), तलमोड दोन हजार ४७१ (दोन हजार ७४, ८३.९३), बेडगा दोन हजार १३० (एक हजार ७२५, ८०.९९), पेठसांगवी दोन हजार ५०७ ( एक हजार ७५३, ६९.९२ प्रभाग दोन बिनविरोध), कोळसूर कल्याण ७४४ (६१७, ८२.९३), कराळी एक हजार १५६ (९११, ७८.८१), कवठा तीन हजार २१५ (दोन हजार ३२२, ७२.२२), समुद्राळ एक हजार ११६ (९३७, ८३.९६), नाईचाकूर तीन हजार ७७० ( दोन हजार ५५७, ६७.८२), दाबका एक हजार ४४ (८४१, ८०.५५),  कुन्हाळी दोन हजार ३६२ (एक हजार ९६२, ८३.०६), वागदरी एक हजार ६४ (८६७, ८१.३०), रामपूर एक हजार १५७ (८५५, ७३.९०), जगदाळवाडी ९४९ (८५५, ९०.१०),  गणेशनगर ३०८ (२४४, ७९.२२), दगडधानोरा/मानेगोपाळ एक हजार ६३७ (एक हजार ३३६, ८१.६१), गुरुवाडी/चंडकाळ ४२६ (३८१, ८९.४४, दोन प्रभाग बिनविरोध), काळानिंबाळा एक हजार ४५२ (एक हजार २२०,८४.०२), सुपतगांव एक हजार ३०० (एक हजार ५५, ८१.१५), गुगळगांव एक हजार ५५९ (एक हजार ३४७), गुंजोटी सात हजार २७४ (पाच हजार १६२, ७०.९६), नाईकनगर मुरूम १५३ (१२६, ८२.३५ दोन प्रभाग बिनविरोध), बोरी ७३८ (६५७, ८९.०२ एक प्रभाग बिनविरोध), मूरळी एक हजार ४० (८७६,८४. २३), जवळगाबेट एक हजार ३७८ (एक हजार १२, ७३.४४), डिग्गी एक हजार ६१६ (एक हजार २०१, ७४.३२ एक प्रभाग बिनविरोध), कडदोरा एक हजार ८२ (८६९, ८०.३१), थोरलेवाडी ६९६ (४०६, ५८.३३), हंद्राळ ६५८ (५७३, ८७.०८), भगतवाडी एक हजार २३४ (एक हजार ४९, ८५.००). दरम्यान हिप्परगाराव, नागराळ (गुंजोटी) आष्टा (जहागीर) येथे केवळ एका एकुण जागेसाठी मतदान झाले. उर्वरीत जागा यापूर्वी बिनविरोध आल्या आहेत.


१६ टेबलवर होणार मतमोजणी
शहरातील अंतु- बळी सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजता १६ टेबलवर मतमोजणी होणार असून साधारणतः बारापर्यंत निकालाची प्रक्रिया पूर्ण होईल असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar