Water Pipeline: पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; महिनाभरातील तिसरी घटना

Marathwada News : औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालये असून कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो.
Water Pipeline: पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; महिनाभरातील तिसरी घटना
Water Pipelinesakal

Nanded: महापालिका हद्दीतील सिडको भागात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी काळेश्वरजवळ फुटली आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

दरम्यान, महिनाभरात तिसऱ्यांदा जलवाहिनी फुटली आहे. या भागातील जनवाहिन्या जीर्ण झाल्या असून रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वारंवर ही स्थिती निर्माण होत आहे.

महापालिकेतील सर्वांत महत्त्वाचा जवळपास ५० हजार लोकवस्तीचा सिडको, हडकोचा भाग आहे. याठिकाणी औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालये असून कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. सध्या नांदेड-लातूर महामार्गाचे काम सुरू आहे.

Water Pipeline: पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; महिनाभरातील तिसरी घटना
Nanded Airport : नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंतीला भगदाड

जुना रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदला जात आहे. यावेळी कारागिरांना जलवाहिन्यांचा अंदाज येत नाही. त्यातच बऱ्याच वर्षांपासून जलवाहिनी गंजलेली असल्यामुळे धक्का लागताच ती फुटते. दरम्यान, काळेश्वर पंप हाउसपासून सिडकोकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनेद्वारे या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. ही मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग विष्णुपुरीजवळ फुटली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. भरपावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यापूर्वी तीन वेळा जलवाहिनी फुटण्याची घटना घडली होती.

सातत्याने अशा घटना घडत असतानाही महापालिकेडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे पाण्याचे असे कुठलेही ठरावीक वेळापत्रक नसल्याने अनेक महिला कधी रात्री, तर कधी पहाटे तीन वाजताच उठून नळाला पाणी येईल, या आशेने वाट पाहतात. या प्रकारामुळे सिडको-हडकोसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक वैतागले आहेत.

Water Pipeline: पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; महिनाभरातील तिसरी घटना
Darna Pipeline Scheme : दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेला ‘खो’; अमृत दोन योजनेच्या पहिल्या टप्प्यात वगळले

दुरुस्तीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

सिडको-हडको भागाला कधी पाणीटंचाई जाणवली नाही. पण, गेली काही दिवस विजेप्रमाणे नळाच्या पाण्याचा लपंडाव चालू आहे. पाण्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्याने पाणीपुरवठा कधी करतील याचा अंदाज येत नाही.

— मनोहर पन्हाळे, नागरिक

काही भागांत सकाळी सात वाजता होणारा पाणीपुरवठा दिवसातून केव्हा होईल याचा नेम नाही. कुठलेही वेळापत्रक ठरलेले नाही. तसेच, अनेक भागांत पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही.

— स्मिता तळवलकर, सिडको, नांदेड.

Water Pipeline: पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली; महिनाभरातील तिसरी घटना
Water Pipeline Leakage : गुड्डूराजानगरात गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com