Video: गुढी उभारल्यानंतर अशोक चव्हाण कोरोनाबद्दल काय म्हणाले...वाचा...

अभय कुळकजाईकर
Wednesday, 25 March 2020

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांनी शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ निवासस्थानी बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारली. गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस असून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच आता आपल्या सर्वांना कोरोना विरुद्धची लढाई सर्वांना मिळून जिंकायची आहे. त्या दृष्टीने आपआपल्या घरी राहून ही लढाई जिंकण्याचा निर्धार करुया, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. 

नांदेड ः गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस असून नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच आता आपल्या सर्वांना कोरोना विषाणू विरुद्धची लढाई सर्वांना मिळून जिंकायची आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी देखील सहकार्य करावे. आपआपल्या घरी राहून ही लढाई जिंकण्याचा निर्धार करु या, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी नांदेडला शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ निवासस्थानी बुधवारी (ता. २५) गुढी उभारली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले. 

हे ही वाचा - रेल्वे स्थानकासह शहरातील भिक्षेकरी बेवारस

एकमेकांना सहकार्य करा
गुढीपाडव्याच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या लढाईसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी देखील एकमेकांना सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे संकट हे फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरतेच मर्यादित नव्हे तर समस्त मानवजातीसाठी भयानक परिस्थिती आहे. म्हणूनच एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असल्याची अपेक्षा श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. 
 
काटेकोरपणे पालक करा
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मिळून निर्धार करुया आणि कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनाच मिळून जिंकायची आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि शासनाचे निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले तर लढाई निच्शितपणे जिंकू, असा विश्‍वासही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

हे ही वाचलेच पाहिजे - Video: लढाई निश्चित जिंकणार; पण तुम्ही घर सोडू नका

 

प्रत्येक व्यक्तीची लढाई
आज घराघरात पारंपारिक गुढीसोबतच कोरोनाविरुद्ध लढण्याच्या ठाम संकल्पाची गुढी उभारली. ही लढाई केवळ सरकारची लढाई नाही, तर ही प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे. या लढाईत सरकारला नागरिकांकडून फक्त सर्व शासकीय निर्देशांच्या काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा आहे. 
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.  
---
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Ashok Chavan say about Corona after raising the Gudi ... Read ...