esakal | सरकारची कापूस खरेदी कधी? व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दर, शेतकरी हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

Kapoos

यंदा परतीच्या पावसाने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात थोडाबहुत हाती आलेला कापूस विकण्यासाठी सरकारची हमीभाव खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभारले आहे.

सरकारची कापूस खरेदी कधी? व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दर, शेतकरी हवालदिल

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : यंदा परतीच्या पावसाने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात थोडाबहुत हाती आलेला कापूस विकण्यासाठी सरकारची हमीभाव खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभारले आहे. व्यापारी मात्र कवडीमोल भावाने कापूस खरेदी करू लागले आहेत. सरकारचा हमीभाव ५८०० रुपयांचा आहे. मात्र, हमीभाव खरेदीचे अद्याप भिजत घोंगडे आहे.

अखेर ॲसिड, पेट्रोल टाकून जाळलेल्या प्रेयसीचा मृत्यू; निर्दयी प्रियकराला नांदेड जिल्ह्यात बेड्या

खरेदीची प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांना तत्काळ (खरेदी नंतर चार दिवसांनी) त्याचा मोबदला मिळावा यासाठी सरकार एक अॅप विकसित करीत आहेत. मात्र, त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे; तसेच खरेदी करणाऱ्या पणन महासंघ यंत्रणेकडे मनुष्यबळ आणि निधीची कमतरता आहे. या घोळामुळे खरेदीला नोव्हेंबर संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा खरीप पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यात थोडाबहुत हाती आलेला कापूस आता व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. व्यापारी साडेचार ते पावणेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर