esakal | जेथे आहात तेथे सुखी राहा म्हणत, नाव न घेता शरद पवारांचा राणाजगजितसिंह पाटील यांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad_Pawar

जेथे आहात, तेथेच सुखाने राहाण्याचा सल्ला, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला.

जेथे आहात तेथे सुखी राहा म्हणत, नाव न घेता शरद पवारांचा राणाजगजितसिंह पाटील यांना सल्ला

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : पक्षातून बाहेर पडलेली काही नेतेमंडळी परत येण्याच्या विचारात असली तरी आम्ही विचार करीत आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षातून बाहेर गेलेल्यांना `नो एन्ट्री` आहे. जेथे आहात, तेथेच सुखाने राहाण्याचा सल्ला, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला. तुळजापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता.१९)  पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाना


श्री. पवार म्हणाले, की निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण पक्ष सोडून गेले. आता यातील अनेकजण पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत. या संदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत. उस्मानाबादमधील नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. आहे तिथे त्यांनी सुखी राहावे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.आपत्तीच्या काळात राजकीय मतभेद विसरुन काम करायची आपली संस्कृती आहे. रविवारी (ता.१८) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी शरद पवार यांनी केली. राज्यपालांना टोला राज्यपाल या पदाची सर्वांनी प्रतिष्ठा जपली पाहिजे.

शिवाय राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. त्यांनी केला पत्रव्यवहार हा मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा वाढविणारा नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यपालांच्या त्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण, ज्यांना थोडाजरी सेन्स आहे, असा माणूस या जागेवर बसणार नाही. `शहाण्याला शब्दाचा मार`असे म्हणत राज्यपालांना त्यांनी टोला लगावला आहे.

शरद पवार कृषी विधेयकावर बोलले; मालाच्या किंमतीची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध

खडसेबाबात सुचक वक्तव्य एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, पक्षाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते, अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी केलेल्या कष्टाची किंमत त्यांच्या पक्षात घेतली जात नाही, असे त्यांना वाटत असावे. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील नांदुरीकर आदी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर