सरपंचाची प्रवाशांना विनंती कशासाठी? ते वाचा

शिवचरण वावळे
गुरुवार, 26 मार्च 2020

शहराला लागुन असलेल्या बळीरामपूर गावात २४९ नागरीक मुंबई- पुण्याहून आले आहेत. या सर्वांचे टेंम्परेचर चेक करुन त्यांच्या हातावर सिक्के मारले आहेत. या नागरीकांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला आहे. परंतु हे नागरीक कुठलिही खबरदारी न घेता राजरोजपणे घराबाहेर फिरत आहेत.

नांदेड : पुणे-मुंबईसह इतर शहरातून नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रवाशांची ‘कोरोना’ची तपासणी करण्यात येत आहे. शहराला लागुन असलेल्या बळीरामपूर गावात २४९ नागरीक मुंबई- पुण्याहून आले आहेत. या सर्वांचे टेंम्परेचर चेक करुन त्यांच्या हातावर सिक्के मारले आहेत. या नागरीकांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला आहे. परंतु हे नागरीक कुठलिही खबरदारी न घेता राजरोजपणे घराबाहेर फिरत आहेत.

ज्या प्रवाशांच्या हातावर कोरोना आजाराची टेंम्परेचर तपासून त्यांच्यावर सिक्के मारुन १४ दिवसापर्यंत होम क्वॉरंटाईनचे आदेश दिले असताना अनेकजन गावभर फिरत आहेत. त्यांचे असे वागणे बघुन बळिरामपुरचे नागरीक दहशतीखाली वावरत आहेत. बळीरामपूरचे सरपंच यांनी गावातील अनेकांना विनंती देखील केली आहे. पण त्यांना बघताच काही वेळासाठी घरात बसतात त्यानंतर पुन्हा गावभर फिरत आहेत. त्यामुळे गावातील नागरीक लहान मुले दहशतीखाली आहेत. यातील एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी, गाव कोरोनाचे केंद्र होईल अशी भिती नागरीकांना वाटु लागली आहे.

 हेही वाचा-  Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

गावचे सरपंच अमोल गोडबोले यांनी सुरुवातीस गावात दाखल झालेल्या १४९ प्रवाशी व्यक्तींच्या नावाची यादी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर या सर्वांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्यात पुन्हा शंभर लोक गावात दाखल झाले. होते त्यांना देखील तपासून होन क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु आम्हाला काहीच झाले नाही. आम्ही का घरात बसू ? असे म्हणत ते संबध गावभर फिरत आहेत.

हेदेखील वाचा-  भाऊराव चव्हाण साखर कारखाना बंद होणार- तिडके

गावचे सरपंच यांनी ग्रामीण पोलीसात देखील तक्रार केली आहे. परंतु त्यांच्याकडेही कुणी फारसे लक्ष देत नाहीत. असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी करावे तरी काय? २०११ च्या जनगननेनुसार गावची लोकसंख्या सहा हजार ६३९ इतकी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गाव मोठे असल्याने त्यांच्यावर कोण बंधन घालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील नागरीकांमध्ये घबराहट पसरली
गावापासून जवळ असलेल्या मारतळा आणि हाळदा या ठिकाणाहून गावात मोठ्या प्रमाणावर दारु येत असून, पंधरा ते सोळा व्यक्ती गावात देशी दारु अणून दोनशे रुपयाला एक क्वॉटर प्रमाणे विक्री करत आहेत. पुणे - मुंबईहून आलेले अनेकजन दारुच्या शोधात घराबाहेर पडत आहेत. स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालत मनसोक्त रस्त्यावर फिरत असल्याने गावातील नागरीकांमध्ये घबराहट पसरली आहे. या सर्वांवर पावबंदी घालण्यासाठी पुन्हा २४९ लोकांच्या नावी यादी घेऊन जिल्हाधिकारी यांना देणार आहे.
- अमोल गोडबोले, सरपंच बळीरामपूर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why request the Sarpanchan travelers Read it Nanded News