esakal | आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप.. 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता.या प्रकरणात पतीला दोषी ठरवून जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी हा निकाल दिला. 

आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) -पत्नीचा खून करून नंतर प्रेयसीचाही खून केल्याच्या आरोपात पतीला दोषी ठरवून जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी सोमवारी (ता. दोन) हा निकाल दिला. अल्पवयीन मुलीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा खून करून पतीने नंतर गर्भवती प्रेयसीचाही खून केला होता. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा शिवारात ही घटना घडली होती. 

या प्रकरणाची माहिती अशी की, येल्डा शिवारात वकिलाची डाग नामक शेतात दिलीप हनुमंत खोडवे आणि त्याची पत्नी प्रीती (वय २१) हे दोघे राहत होते. दिलीप खोडवे जनावरे चारण्यासाठी दररोज शेताच्या बाजूच्या डोंगरावर जात असे. त्याच ठिकाणी जनावरे चारण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत फूस लावून दिलीपने तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले

याचा संशय दिलीपच्या पत्नीला आला होता. त्यामुळे दिलीपसाठी ती अनैतिक संबंधातील अडसर ठरू लागली होती. त्यामुळे चार ऑक्टोबर २०१६ ला रात्री दिलीपने स्वतःच्या घरात पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर शेतात लिंबाच्या झाडाखाली प्रेयसीचाही गळा आवळला. दोघींचा खून केल्यानंतर दिलीपने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पाच ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास या घटनेची सर्वत्र माहिती कळताच एकच खळबळ उडाली.

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गीते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन दिलीप खोडवे यास रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर दिलीप बरा झाला. या घटनेत अल्पवयीन पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून येथील ग्रामीण ठाण्यात दिलीप खोडवे याच्याविरुद्ध खुनाच्या आरोपासह पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.  उपविभागीय पोलिस अधिकारी हरी बालाजी आणि विशाल आनंद यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. पटवारी यांच्यासमोर झाली. त्यात सरकार पक्षाच्या बाजूने १६ साक्षीदार तपासण्यात आले.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

न्यायाधीशांनी घटनेतील साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आरोपी दिलीप खोडवे यास पत्नीचा खून केल्याच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. व्ही. एस. लोखंडे व ॲड. नितीन पुजदेकर यांनी सहकार्य केले. या प्रकरणाच्या तपासात पैरवी अधिकारी गोविंद कदम, पोलिस कर्मचारी बी. एस. सोडगीर, महिला पोलिस कर्मचारी शीतल घुगे यांनी सहकार्य केले. 

loading image