Ganpat Jadhav
sakal
कन्नड - तालुक्यातील उपळा शिवारात शेतातील घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या गणपत कनीराम जाधव (वय ६५, रा. भांबरवाडी) यांच्यावर बुधवारी (ता. २८) मध्यरात्री दोनच्या सुमारास वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात जाधव जखमी झाले असून, त्यांना नातेवाइकांनी रात्री तीनच्या सुमारास कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्याचा दावा जाधव यांनी केला असला, तरी घटनास्थळी किंवा परिसरात बिबट्याचे ठसे आढळले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.