सांगा...आम्ही जायचं कुठं?

महिलांचा संतप्त प्रश्‍न ः बदनापुरातील स्वच्छतागृहेच घाणीने माखली
women over dirty toilets in Badnapur women health
women over dirty toilets in Badnapur women health sakal

बदनापूर : प्रश्न तसा छोटाच आहे मात्र सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या बदनापूर शहरात अद्याप एकही स्वच्छतागृह नाही. अर्थात नाही म्हणायला स्वच्छतागृहे आहेत मात्र तीच घाणीने माखली आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातून बदनापूर शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना विशेषतः महिलांना लघुशंकेसाठी कुचंबणा सहन करावी लागते. त्यांना उघड्या, निर्जन ठिकाणांचा वापर करावा लागतो.

यातून रोगराई होण्याचा धोकाही बळावतो. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारून ग्रामिण भागातील लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

women over dirty toilets in Badnapur women health
How To Impress Girl : 'या' पाच टिप्स ट्राय करुन गर्लफ्रेंडला चॅटिंगवरच करू शकता इंप्रेस

बदनापूर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध शासकीय कार्यालये, बँका आणि बाजारपेठ आहे. एकूणच या ठिकाणी कामानिमित्त ग्रामिण भागांतील महिला - पुरुषांना कामासाठी यावे लागते. अनेकदा कामानिमित्त त्यांना दिवसभर देखील थांबावे लागते.

मात्र लघुशंका आल्यास आपण जायचे कुठे, असा यक्षप्रश्न त्यांना कायम पडतो. नगरपंचायत प्रशासनाने कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली नाही. अर्थात शहरात चार ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केलेली आहे.

women over dirty toilets in Badnapur women health
Men Vs Women : पुरुषांना लवकर मॅच्युरिटी येते की स्त्रियांना? हे वाचाच

मात्र, जवळपास सर्वच शौचालयांत घाण आणि दुर्गंधी असल्याने त्याचा वापर फारसे कुणी करीत नाही. त्यातही नगरपंचायत कार्यालया पाठीमागील शौचालय वगळता ईतर शौचालयांची बांधणी जिथे फारसे लोकं जात नाहीत त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे या शौचालयांचा कुठलाच उपयोग ग्रामीण भागांतील लोकांना होत नाही.

नगरपंचायत प्रशासनाने लोकांची मूलभूत गरज दूर करण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी शौचालय नव्हे तर सार्वजनिक स्वच्छतागृहांची बांधणी करावी. या स्वच्छतागृहांची व्यवस्थित निगा राहावी म्हणून ''बीओटी'' तत्वावर तयार करून निविदा काढून संस्थेला किंवा व्यक्तीला देता येऊ शकते.

सार्वजनिक स्वच्छतागृहांअभावी ग्रामीण भागातील महिला - पुरुषांना लघुशंकेसाठी शहरातील मोडक्या, पडक्या जागांचा वापर करावा लागतो, त्यामुळे त्यांचे अनेकदा स्थानिक लोकांशी खटके देखील उडतात. शिवाय यामुळे काही ठराविक भागांत अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन आजाराला आयते निमंत्रण मिळते.

बदनापूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्यांची विशेषतः महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. प्रशासनाने अशा गंभीर विषयाकडे लक्ष देऊन बदनापुरात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारावीत.

— संजय शेडगे, ग्रामस्थ, काजळा, ता. बदनापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com