'सोंगाड्या' करायचा महिलांची विक्री : दलालांची यादीच सापडली

सुशेन जाधव
बुधवार, 11 डिसेंबर 2019

औरंगाबाद : 'त्याने' बनावट नावाने आधार कार्ड तयार केले, त्याच नावाने तो आजवर विविध गुन्हे करीत राहिला, इतकेच नव्हे तर मध्यप्रदेशात विक्री केलेल्या औरंगाबादेतील महिलांची सुटका झाल्यानंतर संबंधित महिलांच्या लग्नाच्या कागदपत्रांवरही त्यानेच बनावट नावाने स्वाक्षऱ्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

शिवाजी ऊर्फ गणेश धनेधर (गल्ली क्र.दोन, रमानगर) असे आरोपीचे मूळ नाव आहे. गणेश सोंगाडे या बनावट नावाने तो हे कृत्य करायचा. हनुमाननगरातील दोन महिलांची मध्यप्रदेशात विक्री केल्याच्या प्रकरणात धनेधर हा मुख्य सूत्रधार असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. 

तुम्हाला जागेवरच निलंबित करायला हवं...

बनावट आधार कार्ड दिले कुणी? 

पोलिस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपी धनेधर याने गणेश कल्याण सोंगाडे (रा. हिंदुस्थान आवास, पैठण रोड, नक्षत्रवाडी) या नावाने बनावट नावाने आधार कार्ड व तयार केले असून, तो याच नावाने गुन्हा करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. तर एका पीडित महिलेची आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहिती आधारे राजस्थान येथून सुटका करण्यात आली आहे. दोन्ही पीडित महिलांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर अटक आरोपीने गणेश सोंगाडे नावाने बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहायक सरकारी वकील एस.एल. दास (जोशी) यांनी न्यायालयासमोर दिली. 

आरोपीकडे सापडली दलालांची यादी 

तपासादरम्यान आरोपीकडे एक वही सापडली असून, त्यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात आदी ठिकाणच्या 134 व्यक्तींची नावे व फोन क्रमांक आढळले असून, ते क्रमांक दलाल व मध्यस्थींचे असल्याचे आरोपीने तपासावेळी सांगितले आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तींचा तपास करणे बाकी आहे. आरोपीने गणेश सोंगाडे नावाचे आधारकार्ड कोठे व कोणाच्या मदतीने तयार केले याचा शोध घेणे असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

पत्नीचाही अटकपूर्व जामीन फेटाळला 

आरोपीला एक डिसेंबरला अटक करण्यात आली व त्याला शुक्रवार व नंतर मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (ता.12) वाढ करण्याचे आदेश आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे-तांबडे यांनी मंगळवारी (ता.10) दिले. आरोपीची पत्नी संगीता हिने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला असून, तिला अटक करणे बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

हेही वाचा -

कशी होते फाशीची पूर्वतयारी?

फाशीचा दोर कसा तयार करतात?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women trafficking From Aurangabad in Madhya Pradesh