परशुराम कर्मचारी महासंघाचे कार्य प्रेरणादायी, कसे? ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

भगवान परशुराम जयंतीनिमित्त परशुराम कर्मचारी महासंघाने जो उपक्रम हाती घेतला आहे तो खरोखर प्रशंसनीय आहे, प्रेरणादायी असेच आहे.

नांदेड : लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. परिणामी रोजगाराचा प्रश्‍न गंभीर होत चालला असून हातावर पोट असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना आशेचा किरण दाखविण्यासाठी भगवान परशुराम जयंतीनिमित्ताने परशुराम कर्मचारी महासंघातर्फे जिवनावश्‍यक साहित्यांची मदत दिली आहे.
 
अनेक सामाजिक संस्था, संघटना आज आपापल्या परीने गरजूंना जगण्यासाठी आशेचा किरण दाखवत आहेत. त्यापैकीच एक आहे परशुराम कर्मचारी महासंघ. परशुराम जयंतीच्या निमित्ताने त्यांनी कोरोना या महामारी आजारापासून बचाव  होण्यासाठी सुती कॉटनचे मास्क वाटप करण्यात आले. भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, गॅस सिलेंडर वाटप करणारे, दूध वाटप करणारे, पोस्ट, महावितरण, पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, हमाल, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक अशांना हे मास्क वाटप करण्यात आलेले आहे.

हेही वाचा - जयंती विशेष : परिवर्तनवादी युगपुरुष- महात्मा बसवेश्वर

याशिवाय २५० कुटुंबियांना अन्न धान्याची किट (ज्यात गव्हाचे पीठ १० किलो, पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ, तेलाचे पाकिट, एक साबण आदी.) गरजूंना वाटप केले आहे. यामध्ये स्वयंपाकी, त्यांच्या हाताखाली काम करणारे, छोटा व्यवसाय करणारे व्यक्ती, मोल मजुरी करणाऱ्यांचा समावेश आहे.  

शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनेही गरजूंपर्यंत मदत पोचविली जात आहे. मात्र, परशुराम कर्मचारी महासंघाने पद्धतशीर नियोजन करून गरजूंपर्यंत मदत पोचवली जात आहे.  होळी, सराफा परिसरातील ३५ गरजू आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे वाटप लाभार्थ्यांच्या थेट घरी जावून करण्यात आले. तसेच ब्राम्हण पुजाऱ्यांनाही २२५ अन्नधान्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. विपीन,  जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कर्मचाऱ्यांसाठी मास्कचे बॉक्स देण्यात आले आहे. 

हे देखील वाचलेच पाहिजे - हिंगोलीत ‘व्हॉट्ॲप’च्या माध्यमातून बालकांना मिळतेय कृतीयुक्त शिक्षण

थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचवली मदत
श्रीकांत कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, डॉ मुकुंद कुलकर्णी, परीक्षित कुलकर्णी, अनिरुद्ध सिरसाळकर, गंगाधर जामकर, जिवन शेवाळकर,  आशिष वाटेगावकर, समर्थ कुलकर्णी, माधवराव माळवटकर, व्यंकटेश पांडे, दीपक कुलकर्णी, डॉ. उदयकुमार पाध्ये, मंगेश मुळे, श्रीकांत पांडे, मंगेश देशमुख, गजानन कुलकर्णी, उदय कुलकर्णी आदींनी अत्यंत पारदर्शकपणे उन्हात तान्ह्मामध्ये परिस्थिती गंभीर असताना सुद्धा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष लाभार्थीच्या घरापर्यंत किट पोहोचवण्याचे कार्य केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Parashuram Employees Federation is Inspiring Nanded News