esakal | पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प   

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ देवस्थानकडून कळमनुरीतील गरजूंना अन्नधान्याच्या पाचशे किट आमदार संतोष बांगर यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. अन्नधान्याच्या किट वाटप प्रकरणात गोंधळ झाल्याच्या तक्रारीवरून दोन कर्मचाऱ्यांचे निलंबनकरण्यात आले. यावरून शुक्रवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. 

पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प   
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी(जि. हिंगोली) : औंढा नागनाथ देवस्थानकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याच्या किट वाटप प्रकरणात तक्रार व चौकशीअंती पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावित निर्णयानंतर शुक्रवारी (ता.२२) नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात केले. त्यामुळे पालिका कार्यालयातील कुठलेही कामकाज होऊ शकले नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ देवस्थानकडून कळमनुरीतील गरजूंना अन्नधान्याच्या पाचशे किट आमदार संतोष बांगर यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. या किट पालिकेचे पदाधिकारी व सदस्यांमार्फत गरजूंना वाटपही करण्यात आल्या. 

हेही वाचासंतापजजक : प्रेमसंबंधात अडथळा; बारा वर्षीय मुलीला क्रुरतेने संपवले

कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे

मात्र, त्यानंतर पालिकेच्या कामकाजाविषयी नियमित तक्रार करणाऱ्या मंडळींनी अन्नधान्याच्या किट वाटप प्रकरणात गोंधळ झाल्याची तक्रार केली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करून पदाधिकारी व सदस्यांवर कारवाई करावी, असा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता. 

कर्मचाऱ्यांने केले काम बंद आंदोलन

या प्रकरणात बुधवारी (ता. २०) पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे प्रस्तावित केले होते. या निर्णयानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात नाहक बळी दिला जात असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता. २२) कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

पालिकेचे कामकाज ठप्प

 यात पालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर वाघ, आनंद दायमा, डी. ए. गव्हाणकर, नंदकिशोर डाखोरे, मोहम्मद जाकीर, मनोज नकवाल, सुभाष काळे, निकेत यरमळ, मोहम्मद नदीम, गजानन इंगळे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. त्यामुळे शुक्रवारी पालिकेचे कुठलेही कामकाज होऊ शकले नाही.

अधिकारी, कर्मचारी व सदस्यांमध्ये बेबनाव

 कर्मचाऱ्यांवरील प्रस्तावित कारवाई मागे घेईपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कारवाईसाठी गुरुवारी दोन वेळा पोलिस ठाण्यात जाऊन परत आलेल्या अधिकारी, कर्मचारी व पालिका सदस्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला होता, हे विशेष.

हिंगोलीत कामबंद आंदोलन

हिंगोली : कळमुनरी नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याप्रकरणी निषेध करीत शुक्रवारी (ता.२२) येथील पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यात उमेश हेंबाडे, श्याम माळवटकर, रत्‍नाकर अडशिरे, डी. पी. शिंदे, डी. बी. ठाकूर, रघुनाथ बांगर, रविराज दरक, बी. के. राठोड, संदीप घुगे, शिवाजी घुगे, किशोर काकडे, विजय शिखरे, झिंगराजी वैरागड, मयुर शिवशेट्टे, सविता घनसावंत आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

औंढा येथेही काम बंद

औंढा नागनाथ ः येथील नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी कळमनुरीतील कर्मचारी निलंबितप्रकरणी निषेध करत आंदोलन केले. यात कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय महामुने, उपाध्यक्ष विष्णू रणखांबे, यू. व्ही. जाधव, मंजुषा जाधव, डी. बी. मोरे, मनोहर रणखांबे, एच. पी. गवळी, अविनाश चव्हाण, महादेव बळवंते आदीं सहभागी झाले होते.

येथे क्लिक कराहिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू

सेनगावात निषेध आंदोलन

सेनगाव ः येथेही मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले. यात प्रवीण देशमुख, जगन्नाथ दिनकर, विशाल जारे, विनायक पडोळे, देविदास सुतार, लक्ष्मण सुतार, कैलास बीडकर, मिथून सुतार, आकाश देशमुख, विनोद कांबळे आदी सहभागी झाले होते.

वसमत येथेही निषेध

वसमत ः येथे कळमनुरी पालिकेतील कर्मचारी निलंबितप्रकरणी कर्मचाऱ्यानी निषेध केला. यात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. जी. कदम, उपाध्यक्ष एच. टी. मुंधरे, शिवाजी वाघमारे, भुजंग भिसे, मधुर डहाळे, स्‍वलिल अहेमद, सरस्‍वती गायकवाड, सयाबाई बळवंते, पुष्पा भिसे, जिजाबाई भिसे, अनुसया कांबळे, सुमन खंदारे आदी सहभागी झाले होते.