कोसोदूरवरून आलेले कामगार तपासणीसाठी ताटकळले

Arogya tapasani
Arogya tapasani

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्‍यातील खुडज येथे सुरत येथून आलेले कामगार ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (ता.१९) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. येथे त्‍यांना चार तास ताटकळत बसावे लागले. मोठ्या संकटांना तोंड देत गाव गाठलेल्या कामगारांना गावातही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

तालुक्यातील खुडज येथील सहा कामगार रोजगारासाठी सुरत येथे स्थलांतरीत झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे तेथे हे कामगार अडकले होते. हे मजूर सूरत येथून गावी येत असल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली होती. गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील खुडज पाठीवर मंगळवारी सकाळी सहा वाजता मजूर दाखल झाले. 

आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला

तेथे त्यांना उपसरपंच योगेश रहाटे, कैलास गुंजाळकर व ग्रामस्थांनी तुम्ही सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घ्या व क्वॉरंनटाइनचा शिक्का हातावर मारून गावातील शाळेवर राहा, असा सल्ला दिला.

रुग्णालयात सकाळीच पोचले मजूर

संबंधित कामगार ग्रामीण रुग्णालयात सकाळी सव्वासहा वाजता पोचले. तब्बल चार तास सदरील कामगार ताटकळत बसले. त्यांची तत्काळ तपासणी करणे गरजेचे होते. मजुरांची घडलेल्या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर श्री. गुंजाळकर, श्री. रहाटे यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे ही माहिती दिली. 

विनंती करूनही कोणी दखल घेईना

याची दखल घ्या, अशी विनंती केली. मात्र त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या प्रमुखासह इतरत्र ठिकाणी भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यावर त्या सहा कामगारांच्या हातावर क्वॉरंनटाइनचे शिक्के मारल्याची प्रक्रिया घडली, असे गावकऱ्यांनी सांगितले.

आरोग्य कर्मचारी गाभीर्याने घेत नसल्याचा आरोप

दरम्यान, एकीकडे परजिल्हा व परराज्यातून गावात दाखल होणाऱ्या ग्रामस्थांची माहिती वेळीच प्रशासनाला न दिल्यास ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध गंभीर दखल घेतली जाईल, असे आदेश आहेत. तर सतर्कता बाळगून परराज्यातून आलेल्यांची देवूनही आरोग्य विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप खुडजच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला.

मजुरांना ताटकळत बसावे लागले

खुडज येथील सहा स्थलांतरीत कामगार गावी येणार असल्याची माहिती मिळताच त्या मजुरांना आरोग्य तपासणी व क्वॉरंनटाइन शिक्का मारून घ्या, असा सल्ला दिला. त्‍यानंतर ते मजूर ग्रामीण रूग्णालयात गेले. परंतु, त्यांना ताटकळत बसावे लागले.
-योगेश रहाटे, उपसरपंच

कोणतीच गैरसोय झाली नाही

सेनगाव ग्रामीण रुग्णालयात दररोज अनेक नागरिक तपासणीसाठी येत आहेत. त्यांची योग्य तपासणी केली जाते. खुडजचे सहा ग्रामस्थ आले होते. त्यांची रक्ततपासणी करण्यासाठी रक्तपेढी नऊनंतर सुरु होते. तपासण्यानंतरच पुढील निर्णय घेतला जातो. त्या कामगारांची कोणतीच गैरसोय झाली नाही.
-डॉ. सतीश राठोड, वैद्यकीय अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com