चुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव

हरी तुगावकर
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

लातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची
गरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती राबवली गेली तर ती देश तसेच
लोकशाहीसाठी आपत्ती ठरेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.

येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील
यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित उच्च शिक्षणातील नवे पैलू या
एकदिवशीय चर्चासत्राचे उदघाटन मंगळवारी (ता. १६) राव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल शिवराज पाटील
चाकूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,
खासदार सुनील गायकवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
प्रभारी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. पाटील व संस्थेचे सचिव
प्राचार्य अनिरुद्ध जाधव उपस्थित होते.

दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नॅकची समिती आली. पण अनेक महाविद्यालये नॅकला काळजीपूर्वक घेत नाहीत. शार्टकटचा अवलंब करतात. अशी श़ॉर्टकटची पद्धत शिक्षण क्षेत्रासाठी घातक आहे. आज अनेक महाविद्यालये लग्नाच्या मंडपात भरल्या सारखी भरवली जातात. मुलभूत सुविधा देखील पहायला मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.
राज्यपाल म्हणून अनेक विद्यापीठात पदवीदान समारंभाला मी जात आहे.
सुवर्णपदक विजेत्यात मुलींच अग्रेसर आहेत. पण पुढे उच्च पदावर किंवा
कंपन्यातील उच्चस्थानी या मुली दिसत नाहीत. विवाह किंवा कौटुंबिक
कारणामुळे त्या बाहेर पडत आहेत. ही देखील चिंताजनक बाब आहे, असे ते
म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात सॅटेलाईट पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शिक्षणाला वयोमर्यादा नसते. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती शिक्षण घेत असतो, असे चाकूरकर म्हणाले.

Web Title: wrong education system will be disaster for country c vidyasagar rao